इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘बोलो ता रा रा रा’ आणि तुनक तुनक तून म्हणत सगळ्यांना आपल्या गाण्यावर थिरकायला लावणाऱ्या गायक दलेर मेहेंदी याचे गाणेच त्यांची ओळख बनले आहे. दलेर मेहंदी यांचे १९९५ मध्ये आलेले हे गाणे त्यांच्या संगीतातील करिअरला वेगळे वळण देणारे ठरले. या गाण्याने ते रातोरात लोकप्रिय झाला. विशेष म्हणजे या गाण्याने एक नवा इतिहास रचला. बघता – बघता त्याच्या जवळपास २० दशलक्ष कॉपी विकल्या गेल्या. यानंतर दलेर मेहंदीने मागे वळून पाहिले नाही. आपल्या वेगळ्या शैलीतील गाण्याने त्याने संगीत जगतात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
१९६७ मध्ये बिहारच्या पटणा येथे दलेर मेहंदीचा जन्म झाला. त्याने आपल्या आयुष्यात संगीताशी नाळ जोडली. मात्र नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करावं या विचाराने त्याने गर्दीला आकर्षित करण्यासाठी जबरदस्त पार्टी व्हर्जन गाण्यांची निर्मिती करत प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. आता नवनवीन कितीही गाणी येऊ देत दलेर मेहंदीचे गाणे त्यात वाजणारच आणि त्या गाण्याच्या तालावर भांगडा झाला नाही तरच नवल !
दलेर मेहंदी यांनी गायक म्हणून लोकांचे मनोरंजन केले आहे, ते लेखक आणि बॉलीवूडमधील त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी एकापेक्षा जास्त हिट संगीत दिले आहेत. मात्र प्रत्येक यशस्वी व्यक्तीची वाटचाल संघर्षमय असते. आयुष्यात संघर्ष केल्याशिवाय कुणालाही यशाचे शिखर सहज शक्य होत नाही तसेच मेहेंदी यांच्याबाबत देखील झाले. दलेर जेव्हा केवळ ११ वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी संगीत शिक्षणासाठी घर सोडले.
त्यानंतर त्यांनी गोरखपूरच्या उस्ताद राहत अली खान यांच्याकडून संगीत शिकले आणि वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी दलेर मेहंदी यांनी पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केले. त्यावेळी सुमारे २० हजार लोक तेथे जमले होते. येथूनच त्यांचा गायनविश्वातील प्रवास सुरू झाला. दलेर मेहंदी यांची धमाकेदार गाण्यांनी आणि संगीताने पंजाबी इंडस्ट्रीमध्ये मोठी कमाई सुरु होती. पण त्याच्या मित्रांना त्याने बॉलीवूडमध्येही आपली छाप पाडावी अशी इच्छा होती, ही इच्छा त्यांनी बोलून देखील दाखवली. तेव्हा दलेर मेहंदीने उत्तर दिले की जेव्हा माझे पाजी म्हणतील तेव्हा मी बॉलीवूडमध्ये गाणे म्हणेल. मात्र, हे ऐकल्यानंतर दलेर हे अभिनेता धर्मेंद्रबद्दल बोलतायेत असे सर्वांना वाटले. पण दलेर मेहंदी यांनी ते खोडून काढत मी अमिताभ बच्चन यांच्या फोनबद्दल बोलत आहे असे स्पष्ट केले.
दलेर मेहंदी यांचा विश्वास पक्का होता आणि अमिताभ बच्चन त्यांना एक दिवस नक्कीच फोन करतील असे त्यांनी सांगितले. मित्रासोबतच्या या संवादानंतर अवघ्या दोन महिन्यांतच अमिताभ बच्चन यांनी त्यांना फोन केल्याचे सांगितले जाते. यानंतर त्यांना अमिताभ बच्चन यांच्यासाठी दलेर यांना गाण्याची संधी मिळाली. त्यांच्या १९९५ मध्ये ‘बोलो ता रा रा’ या गाण्याच्या २० दशलक्ष कॉपी हातोहात विकल्या गेल्याचा विक्रम आजही कायम आहे.
Singer Daler Mehndi Interesting Thrilling Life Journey
Bollywood Entertainment Music Punjabi