त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी व संदिप युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक इंजि. डाॅ. सिध्दार्थ ज्योति रविंद्र धारणे यांना द इंटरनॅशनल ख्रिस्तियन युनिव्हर्सिटी वतीने फाईन आर्टस् मध्ये पिएचडी ने सन्मानित करण्यात आले. दि. १७ डिसेंबर २०२२ रोजी उत्तर गोवा मधील रेडिसन या पंचतारांकित हाॅटेलमध्ये हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. फाईन आर्ट मधील योगदाना बद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
याठिकाणी झालेल्या कार्यक्रमासाठी गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार दिगंबर कामत, विद्यापिठाचे आंतरराष्र्टीय प्रतिनिधी गेरीशोम वाकोली, डॅा. राजश्री नागराजन, एम. नागराजन,डॅा. सबॅस्टीयन मेंडीस आदींसह विद्यापिठाचे कुलगुरु, पदाधिकारी, आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रा. सिध्दार्थ यांना सन्मानित करतांना सर्वांनी टाळ्या वाजवुन कौतुक केले. या सुयशाबद्दल संदिप युनिव्हसिटीचे चेअरमन संदीप झा, व्हाईस चान्सलर राजेंद्र सिन्हा, रजिस्र्टार डॅा. अनिल माहेश्वरी, ओएसडी विवेक निकम, प्रमोद करोले, डीन डॅा.विभा कपुर व सहकार्यांनी अभिनंदन केले. या सुयशाबद्दल विविध स्तरातुन त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पत्रकार रविंद्र धारणे यांचे ते चिरंजीव आहे.