India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘सुहास कांदे, हे बघा आणि आता आमदारकीचा राजीनामा द्याच’; शिवसेनेचे खुले आव्हान

India Darpan by India Darpan
July 23, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांना शिवसेनेने आता खुले आव्हान दिले आहे. कांदे यांचा मतदारसंघ असलेल्या नांदगाव मतदारसंघात शुक्रवारचा दिवस अतिशय तणावपूर्ण होता. कांदे यांनी बंडखोरी केल्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा मेळावा मनमाडमध्ये झाला. त्या मेळाव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कांदे यांनीही मोठा मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केले. राज्यात पहिल्यांदाच बंडखोर आमदार आणि ठाकरे हे जवळपास समोरासमोर आले. त्यामुळे ही बाब राज्यपातळीवरच चर्चेची ठरली. आता शिवसेनेने कांदे यांना खुले आव्हान दिले आहे.

कांदे यांनी आदित्य ठाकरे यांना १० प्रश्न विचारले होते. माझे काय चुकले या नावाने त्यांनी त्यांचे निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यात कांदे यांनी नमूद केले होते की, आदित्य ठाकरे यांच्याकडे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पर्यटन आणि पर्यावरण खाते होते. मी असंख्य पत्रे दिली पण आदित्य यांनी काहीच निधी दिला नाही. त्यांनी किती निधी दिला हे सांगावे, मी तत्काळ आमदारकीचा राजीनामा देतो, असे आव्हान कांदे यांनी दिले होते. त्यानंतर शिवसेनेने आता नांदगाव मतदारसंघात दिलेल्या निधीची अधिकृतपणे माहिती सादर केली आहे. कांदे यांनी पर्यटन विभागाला दिलेल्या शिफारस पत्रांनुसार एकूण ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यातील २ कोटी १५ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. ही कामे नक्की कोणती आहे त्याचा तपशीलही सोबत देण्यात आला आहे. त्यामुळे ही बाब पाहून आता कांदे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे, असे खुले आव्हान शिवसेनेने दिले आहे. यासंदर्भात आता कांदे काय प्रतिक्रीया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आमदार सुहास कांदे म्हणाले आदित्य जी ठाकरे यांनी मतदारसंघासाठी एकही रुपया निधी दिला नाही, दिला असेल तर तो दाखवावा मी राजीनामा देईन…
हा पहा निधीचा तपशील…@MrSuhasKande आता आपण राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे… pic.twitter.com/StOJyRdw04

— Shivsena Communication (@ShivsenaComms) July 22, 2022

Shivsena Open Challenge to Rebel MLA Suhas Kande


Previous Post

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची ही आहे स्थिती

Next Post

अनोखा योगायोग! नाशिकमध्ये एकाच व्यासपीठावर येणार दोन पद्मविभूषण; या सोहळ्याचे ठरणार निमित्त

Next Post
संग्रहित छायाचित्र

अनोखा योगायोग! नाशिकमध्ये एकाच व्यासपीठावर येणार दोन पद्मविभूषण; या सोहळ्याचे ठरणार निमित्त

ताज्या बातम्या

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

बँकेचा चेक देताना चार वेळा विचार करा! बाऊन्स झाला तर आता होणार ही कठोर कारवाई

January 28, 2023

गर्लफ्रेंडने तुडवले, कंपनीनेही दूर लोटले! ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कची जगभरात जोरदार चर्चा

January 28, 2023

इंडिया दर्पण – विचार पुष्प – तुमची प्रगती अखंडपणे चालू राहील

January 28, 2023

डोंबिवलीहून नवी मुंबई आता अवघ्या काही मिनिटांत; पारसिक बोगदा दोन्ही बाजूने खुला

January 27, 2023

अनेक दशके झाली तरी वेठबिगारीचं भूत आदिवासींच्या मानगुटीवर का आहे? त्याचं मूळ नक्की कशात आहे?

January 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group