India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शिर्डीत होणार ‘महापशुधन एक्सपो’; देशातील सर्वात मोठे प्रदर्शन.. ४६ एकर जागेवर… ६५ प्रकारच्या विविध पशुपक्ष्यांच्या जाती…

India Darpan by India Darpan
March 7, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे आयोजन २४ ते २६ मार्च २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.

प्रदर्शनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या लोगोचे अनावरण महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी बोलत होते. यावेळी खासदार डॉ सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ शीतलकुमार मुकणे,प्रादेशिक पशुसंवर्धन आयुक्त बाबुराव नरवाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ सुनिल तुंबारे यांच्यासह शिर्डीमधील पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

या प्रदर्शनाच्या संदर्भात माहिती देताना पशुसंवर्धनमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, देशातील १३ राज्यातील पशुपक्षी सहभागी व्हावेत असा प्रयत्न आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे महत्त्व पटवून देवून देशी गोवंशामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून आणणे, सुशिक्षित बेरोजगारांना पशुपालनाद्वारे स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यायोगे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे, दूध मांस अंडी उत्पादनास चालना देणे, जनावारांची उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करणे, लिंग विनिश्चित केलेल्या विर्यमात्राचा कृत्रिम रेतन कार्यक्रमात वापर, वैरण उत्पादनास चालना देणे, मुरघास हायड्रोपोनिक अझोला तंत्रज्ञान यासारख्या विषयांबाबत पशुपालकांना प्रात्यक्षिकांसह या प्रदर्शनात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे पशुपालकांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल असा विश्वासही पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे-पाटील यांनी व्यक्त केला.

शास्त्रोक्त पध्दतीने पशुपालन करण्यासाठी आवश्यक यंत्रे उपकरणे तसेच पशुसंवर्धनाशी निगडीत बाबीसाठीच्या उत्पादनाचे स्टाॅल सुमारे ४६ एकराच्या क्षेत्रामध्ये उभारण्यात येणार असून,६५ प्रकारच्या विविध पशुपक्ष्याच्या जाती या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.नागपूर येथील महाराष्ट्र पशु विज्ञान व मत्स विज्ञान विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा यामध्ये सक्रीय सहभाग राहाणार असून या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाच लाख शेतकऱ्यांचा सहभाग या प्रदर्शनात राहील असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरषोत्तम रुपाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रदर्शनाच्या निमित्ताने निमंत्रित करण्यात आले असल्याचे श्री.विखे पाटील यांनी सांगितले. ‘महापशुधन एक्स्पो ‘हा पशुसंवर्धन विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पध्दतीने पशुपक्षी पालन करण्यासाठी या व्यवसायात नव्याने येत असलेल्या युवकांना पर्वणी ठरेल असे पशुसंवर्धन मंत्र्यांनी सांगितले.

निळवडे धरणाचे लोकार्पण आणि श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थापन समितीच्या दर्शन रांगेच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वी निमंत्रण दिले असून राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रधानमंत्र्यांना विनंती केली असल्याचे महसूलमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Shirdi Mahapashidhan Expo 2023 Organized


Previous Post

रेल्वे अपघातात १७ वर्षीय मुलाचा रेल्वेच्या धडकेत तर २० वर्षीय तरूणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू

Next Post

‘विरोधी सदस्यांचे माईक अनेकदा बंद केले जातात’, राहुल गांधींचा लंडनच्या संसद भवनात हल्लाबोल

Next Post

'विरोधी सदस्यांचे माईक अनेकदा बंद केले जातात', राहुल गांधींचा लंडनच्या संसद भवनात हल्लाबोल

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group