जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सुमारे तीन-चार महिन्यांपूर्वी शिंदे गटाने बंडखोरी करत गाठली होती, ते ४० आमदार पुन्हा गुवाहाटी दौऱ्यावर जात आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे ४० रेडे गुवाहटीला जात असल्याची टीका केली होती. त्याचवेळी शिंदे गटाचे नेते व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पाटील म्हणाले की, आमचे ४० रेडे दर्शनासाठी गुवाहाटीला जात आहेत. मात्र, मला जाता येणार नाही. जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात भाजप आणि शिंदे गटाचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री आणि आमदार हे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने मी वाहाटीला जाणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. खरे म्हणजे राज्यातील चार महिन्यापुर्वीच्या सत्ता पालट नाट्यात प्रामुख्याने गुवाहाटीचा वारंवार उल्लेख येत होता. कारण एकनाथ शिंदेंसह तत्कालीन सरकारमधील ४० आमदार सूरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर या राजकीय घडामोडीत गुवाहाटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यात मुंबईला येताना शिंदेंसह सगळे आमदार गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुवाहाटीला चालले आहेत.
या दौऱ्याबाबत बोलताना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्यातील सगळेच आमदार जात आहे. पण मला जाता येणार नाही. कारण इकडे निवडणूक असल्याने मी मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती केली आहे. ज्यादिवशी आम्ही रात्रीच उशीरा इकडे येऊ तेव्हा दुसऱ्या दि. २८ ला आम्हाला मतदारसंघात यावे लागेल. कारण त्यादिवशी उमेदवारी माघारी घेण्याचा दिवस आहे. आपला एकतरी प्रतिनिधी असावा, यासाठी मी विनंती केली. पण निश्चितपणे बाकीचे आमदार जाणार आहेत असे सांगितले. परंतु हे सांगताना गुलाबराव पाटील यांची जिभ घसरली आणि ते म्हणाले की, त्यावेळी आमचे ४० रेडे जाता आहेत. त्यांना दर्शन घ्यायचे आहे, असे वादग्रस्त विधान त्यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली. तसेच मागील वेळी गेले तेव्हा तिथल्या हॉटेलचे बिल द्यायचे राहिले, त्यामुळे त्या मालकाने आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. नेमके काय झाले याबाबत माहिती नाही, मात्र काही ठिकाणी आपण बकरा कापतो, कोंबडी कापतो तसं तिथे रेडे कापतात म्हटले जाते. रेड्याचा बळी दिला जातो मग ते कुणाचा बळी द्यायला चाललेत माहिती नाही, असे सांगत अजितदादांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर खोचक टीका केली.
Shinde Group Leader About 40 MLA Guwahati Tour Politics
Water Supply Minister Gulabrao Patil Jalgaon Election