विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिल्लीत आज पुन्हा भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चेला आता उधाण आले आहे. कालच शरद पवार हे दिल्लीला गेल्यानंतर ही पहिली भेट प्रशांत किशोर यांनी घेतली आहे. याअगोदर ते मुंबईत भेटले होते. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात या भेटीला विशेष महत्त्व आहे.
शरद पवार यांच्या आजारपणावर मंध्यतरी छोटी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांना डॉक्टरांकडून विश्रांतीला सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे त्यांचे सर्व पूर्ननियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यानंतर प्रथमच ते दिल्ली दौ-यावर गेले आहेत. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचे कार्यक्रम पूर्वनियोजित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौ-यावर आहेत. जयंत पाटील कार्यक्रमात व्यग्र आहेत. त्यामुळे ही भेट राष्ट्रीय राजकारणात होणा-या घडामोडीवर असल्याचे बोलले जात आहे.