इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ड्रग्ज प्रकरणानंतर स्टार किड आर्यन खान हा कुठेच सक्रिय नव्हता. हे प्रकरण झाल्यानंतर वर्षभराने तो सोशल मीडियावर, तर कधी पार्टीत दिसतो आहे. चर्चेत असलेला आर्यन आता अजून एका नवीन गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. एका अभिनेत्रीने थेट आर्यनला ‘कुछ कुछ होता है’ म्हणत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. या अभिनेत्रीने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत ‘मॉम’ या चित्रपटात काम केलं होतं. इन्स्टाग्रामवर आर्यनचा फोटो पोस्ट करत तिने आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
सजल अली असे या अभिनेत्रीचे नाव आहे. सजल ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर आर्यन फारसा सक्रिय नसला तरी त्याचे बरेच फॉलोअर्स आहेत. सजलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आर्यनच्या इन्स्टाग्रामवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये तिने शाहरुख आणि अनुष्का शर्माच्या चित्रपटातील ‘हवायें’ हे गाणं लावलं आहे. त्याचसोबत त्यावर हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. सजलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यामुळे पुन्हा एकदा आर्यन खान चर्चेत आला आहे.
Shahrukh Khan Son Aryan Khan Love Actress Sajal Aly