मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राणा कपूर यांना AT-१ बाँडच्या चुकीच्या पद्धतीने विक्री केल्याबद्दल २ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) हा दंड ठोठावला आहे. यासोबतच राणा कपूरला ४५ दिवसांत दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत.
हे प्रकरण बँकेच्या अधिकाऱ्यांनी किरकोळ गुंतवणूकदारांना बँकेच्या AT-१ बाँडची चुकीच्या पद्धतीने विक्री करण्याशी संबंधित आहे. एटी-१ (अतिरिक्त टियर-१) बाँड्सची विक्री करताना बँकेच्या अधिकाऱ्यांनी गुंतवणूकदारांना जोखमीची माहिती दिली नाही, असा आरोप करण्यात आला. AT-१ बाँडची विक्री २०१६ मध्ये सुरू झाली आणि २०१९ पर्यंत सुरू राहिली. मार्केट रेग्युलेटरच्या म्हणण्यानुसार, कपूर AT-१ बाँडच्या विक्रीशी संबंधित संपूर्ण कामांवर देखरेख करत होते आणि विक्री वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणत होते.
बँकेने डिसेंबर २०१३, डिसेंबर २०१६ आणि ऑक्टोबर २०१७ मध्ये डिबेंचर स्वरूपाचे रोखे जारी केले होते. बँकेने म्हटले आहे की रोखीने अडचणीत असलेल्या बँकेच्या पुनरुज्जीवन योजनेचा भाग म्हणून २०१६ आणि २०१७ मध्ये जारी केलेले AT-१ बाँड त्यांच्या मूल्याशी समायोजित केले गेले आहेत.
सेबीने यापूर्वी आपल्या एका आदेशात म्हटले होते की येस बँक आणि काही अधिका-यांनी AT-१ बॉन्ड्सची विक्री करणार्या ग्राहकांना हेराफेरीची योजना आखली होती. SEBI ने सांगितले की, AT-१ बाँडच्या विक्रीदरम्यान, वैयक्तिक गुंतवणूकदारांना त्यांच्या खरेदीशी संबंधित जोखमींबद्दल माहिती देण्यात आली नाही.
SEBI 2 Crore Fine to Yes Bank Rana Kapoor Fraud AT1 Bonds