India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

साताऱ्यातील या ४ गावांची लॉटरी… शेतीला मिळणार मुबलक वीज… हा प्रकल्प कार्यान्वित

India Darpan by India Darpan
May 27, 2023
in राज्य
0

 

सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतीसाठी दिवसा भरवशाचा वीजपुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने जून २०१७ मध्ये महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली. त्यात ४.२ मेगावॅटचा सोनगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथील सौर ऊर्जा प्रकल्प आज कार्यान्वित करण्यात महानिर्मितीला यश आले आहे.

सोनगाव – स्थापित क्षमता ४.२ मेगावाट :
सोनगाव तालुका फलटण जिल्हा सातारा या सौर प्रकल्पामुळे नजीकच्या ४ गावांना सोनगाव, राजळे, साठे फाटा आणि सराडे या गावातील सुमारे १७०० कृषी वीज ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. सदर प्रकल्प महावितरणच्या ३३/२२ के.व्ही. राजळे उपकेंद्राला जोडण्यात आला आहे. सुमारे १० हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

प्रकल्प उभारणीचा खर्च १६ कोटी आहे. महानिर्मिती, मेसर्स ई.ई.एस.एल.(विकासक), मेसर्स टाटा (सब व्हेंडर) आहेत. आजघडीला महानिर्मितीच्या एकूण ३७१.६२ मेगावाट स्थापित क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज उत्पादन होत आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवर १० व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. सौर ऊर्जेद्वारे मिळणारी वीज सुमारे रु.३.३० प्रती युनिट दराने मिळणार असून महावितरण समवेत वीज खरेदी करार करण्यात आला आहे.

पुढच्या महिन्यात
आगामी जून महिन्यात महानिर्मितीचे बोर्गी (जिल्हा-सांगली) २ मेगावाट, कुंभोज (जिल्हा-कोल्हापूर) ४.४ मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. मा.उप मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांचे निर्देशानुसार तसेच महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अनबलगन यांच्या मार्गदर्शनाखाली १०० मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी विकासकाला इरादा पत्र देण्यात आले आहे तसेच ४०० मेगावाटचे इरादा पत्र देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ करिता सुमारे १ हजार मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून संचालक(प्रकल्प) आणि संपूर्ण सौर प्रकल्प चमू यासाठी परिश्रम घेत आहेत.

Satara Solar Project 4 Villages Agri Electricity


Previous Post

मशिदींवरील भोंग्यांवरुन मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना पुन्हा फटकारले

Next Post

सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन… अन् शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा.. मंत्री सावे म्हणाले….

Next Post

सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन... अन् शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा.. मंत्री सावे म्हणाले....

ताज्या बातम्या

सुनिता धनगर

अखेर शिक्षण विभागाला जाग लाचखोर सुनीता धनगर हिच्यावर केली ही कारवाई

June 9, 2023

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023

धक्कादायक! इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला… खलिस्तानी समर्थकांचे कॅनडात कृत्य… सर्वत्र संताप

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group