सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सटाणा बाजार समितीतील सत्ता संघर्ष शिगेला; सभापती उपसभापती निवड कोरमअभावी तहकूब

by India Darpan
एप्रिल 22, 2025 | 7:02 am
in स्थानिक बातम्या
0
Untitled 27

सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सटाणा बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदासाठी आज होणारी निवड प्रक्रिया सत्ताकेंद्राच्या अंतर्गत संघर्षामुळे कोरमअभावी तहकूब करण्यात आली. यशवंत शेतकरी पॅनलमधील नेत्यांमध्ये एकमत न झाल्याने पॅनलचे ८ व शेतकरी विकास पॅनलचा १ संचालक अनुपस्थित राहिले. त्यामुळे आवश्यक कोरम न भरल्याने निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.

अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत यशवंत शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी ९ जागा जिंकून बहुमत सिद्ध केले होते. त्यांना शेतकरी विकास पॅनलच्या एका संचालकाचा पाठिंबा मिळाल्याने सत्ता स्थापन होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. निवडीनंतर पॅनलचे सर्व संचालक १८ दिवसांच्या सहलीवर गेले होते. रविवारी रात्री ते परतले, मात्र सभापती निवडीच्या पूर्वसंध्येला पॅनलमधील नेत्यांमध्ये गटबाजी समोर आली.

सभापतीपदासाठी रवींद्र सोनवणे आणि माजी जि.प. सदस्या सिंधुताई सोनवणे या दोघांची नावे आघाडीवर होती. माजी सभापती संजय सोनवणे, डॉ. प्रशांत सोनवणे आणि गजेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. मात्र रवींद्र सोनवणे यांचा ठाम आग्रह व संजय सोनवणे यांचा पत्नी सिंधुताई यांना सभापती करण्याचा आग्रह यामुळे मतैक्य साधले गेले नाही.

अखेर आज सकाळी होणाऱ्या सभेवेळी यशवंत शेतकरी पॅनलचे ८ व त्यांच्यासोबत असलेला शेतकरी विकास पॅनलचा एक संचालक गैरहजर राहिल्याने सभापती निवड प्रक्रिया कोरमअभावी तहकूब करण्यात आली.या घडामोडींमुळे तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून, पुढील रणनीती कशी ठरते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलने पटकावले वर्ल्ड रोबोटिक्स विजेतेपद….जागतिक स्तरावर भारताची छाप

Next Post

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यंटकांचा मृत्यू…महाराष्ट्रातील दोन पर्यटकही मृत्यूमुखी

Next Post
GpIdGJtXYAAi5DE

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यंटकांचा मृत्यू…महाराष्ट्रातील दोन पर्यटकही मृत्यूमुखी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011