निलेश गौतम, इंडिया दर्पण वृत्तसेवा
डांगसौंदाणे – बागलाण तालुक्यात सध्या ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत १८ डिसेंबर ला होणाऱ्या या निवडणुकामध्ये अनेक प्रस्थापित ग्रामपंचायतीच्या ही निवडणुका होत असल्याने सध्या गावगावात निवडणूक प्रचाराने वेग घेतला आहे ..
तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या डांगसौंदाणे ग्रामपंचायतीची निवडणूक मोठ्या रंगतदार पद्धतीने होतांना दिसत आहे.पारंपरिक राजकीय विरोधक असलेले बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक संजय सोनवणे यांच्या सत्ताधारी जलदुर्गा ग्रामविकास पॅनल समोर माजी सरपंच कैलास बोरसे यांचा समर्थ परिवर्तन पॅनल ने आवहान उभे केले आहे.
थेट सरपंच पदासह ११ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत राखीव प्रवर्गातील ३ जागा ।बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरीत ८ जागांसाह सरपंच पदासाठी ही निवडणूक होत आहे .अनु. जमाती महिला राखीव साठी सरपंच पद आरक्षित असल्याने या पदासाठी सत्ताधारी जलदुर्गाग्रामविकास तर्फे सिंधुबाई केदा निकम या निवडणूक लढवीत आहेत तर समर्थ परिवर्तन तर्फे विमल दत्तू वाघ या सरपंच पदासाठी निवडणूक लढवीत आहेत. याच निवडणुकीत सदस्य पदासाठी प्रभाग तीन मधून जलदुर्गा ग्रामविकास पॅनल प्रमुख संजय सोनवणे यांच्या सौभाग्यवती सिंधुताई सोनवणे निवडणूक लढवीत आहेत त्यांच्या समोर कैलास बोरसे यांच्या पत्नी गायत्री बोरसे या निवडणूक लढवीत आहेत स्वता पॅनल प्रमुख असलेले कैलास बोरसे ही याच प्रभागातून निवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ बोरसे यांच्या समोर निवडणूक लढवीत आहेत.
एकाच प्रभागात पती -पत्नी निवडणूक लढविण्याची घटना डांगसौंदाणे ग्रामपंचायतिच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. तर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती उपसभापती पद भूषविलेल्या सिंधुताई सोनवणे ग्रामपंचायतिच्या निवडणुकीत उतरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रभाग क्रमांक एक मधुन माजी सरपंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राहिलेले निवृत्ती सोनवणे हे समर्थ परिवर्तन पॅनल कडुन तर त्यांचे समोर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख असलेले रवींद्र सोनवणे हे अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. प्रभाग क्रमांक एक मध्ये या दोघा उमेदवारांमधील लढत प्रतिष्ठेची समजली जात आहे. प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रगतशील शेतकरी असलेले पंढरीनाथ देवमन सोनवणे यांच्या पत्नी रेखा सोनवणे या समर्थ परिवर्तन कडुन तर रवींद्र केदा सोनवणे यांच्या पत्नी वंदना सोनवणे या जलदुर्गा पॅनल कडुन निवडणूक लढवीत आहेत. याच प्रभागात अपक्ष उमेदवार म्हणून भारती चिंचोरे याही निवडणूक लढवीत आहेत. दोघा पॅनल कडुन हा प्रभाग प्रतिष्ठेचा समजला जात आहे.
प्रभाग क्रमांक एक मध्ये राखीव जागेत जलदुर्गा तर्फे नमर्दा सोनवणे, तर समर्थ परिवर्तन तर्फे वत्सला पवार प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन जागा बिनविरोध झाल्याने या ठिकाणी एकाच जागेसाठी निवडणूक होत आहे अनु .जातीच्या या जागेवर माजी सरपंच सचिन वाघ यांच्या मातोश्री पुष्पा वाघ या समर्थ परिवर्तन कडुन तर त्यांच्या समोर सुरेखा पवार या जलदुर्गा पॅनल कडुन निवडणूक लढवीत आहेत. प्रभाग क्रमांक ४ मध्ये राखीव प्रवर्गातून जलदुर्गा पॅनल कडुन विद्यमान सदस्य रामदास पवार व माजी सरपंच गुलाब सोनवणे हे निवडणूक लढवीत आहेत तर समर्थ परिवर्तन कडुन काळू राजाराम मोरे व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धाकू रामा सोनवणे हे निवडणूक लढवीत आहेत. निवडणूक अंतिम टप्यात अतिशय चुरशीची होत असुन दोघा ही पॅनल मध्ये काटे की टक्कर होत असल्याने सध्या निवडणूक वातावरण एन थंडीत तापले आहे.