मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहून राऊत यांनी फार मोठं काम केलं…शरद पवार

by Gautam Sancheti
मे 17, 2025 | 10:50 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 35

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई येथे शनिवारी ‘सामना’ आणि ‘न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस’ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या संजय राऊत यांच्या लेखणीतून उतरलेला “नरकातला स्वर्ग (तुरुंगातले अनुभव)” या पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार, उध्दव ठाकरे, जावेद अख्तर, साकेत गोखले यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, आजचा हा कार्यक्रम लक्षात राहणारा असा हा कार्यक्रम आहे. संजय राऊत यांनी जे काही १०० दिवस ‘आर्थर रोड’ या माहित असलेल्या जेलमध्ये घालवले आणि तिथले सगळे अनुभव लिखित स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांसमोर मांडले. कुणी गुन्हा केला असला, त्याच्यावर केस झाली असेल, त्याचा निकाल लागला असेल तर असं संकट काही लोकांवर येत असतं. पण संजय राऊत यांनी काय केलं होतं? संजय राऊत नेहमीच ‘सामना’मध्ये जी रोखठोक भूमिका मांडतात, ती आपल्या स्वभावाप्रमाणे मांडत असत. ती त्यांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती, ते अस्वस्थ होते. मोठ्या संधीची ते वाट पाहत होते आणि त्यांना संधी दिली पत्रा चाळ ही जी एक वस्ती आहे त्या प्रकरणातून.

पत्रा चाळीमध्ये कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते. त्यांच्या निवाऱ्याचा काही प्रश्न निर्माण झाला. त्या चाळकऱ्यांना घरं मिळावीत, अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडे होती आणि ते संजय राऊत यांच्याकडे पोहोचले. त्याच्यामध्ये संधी मिळाली ती त्यांच्या नेहमीच्या लिखाणामुळे जे दुखावलेले होते, त्या शासकीय यंत्रणेला. ईडी यांचं योगदान या प्रकरणामध्ये अधिक आहे. ईडीने जी केस केली त्याच्यामध्ये संजय राऊत यांचा यत्किंचितही संबंध नसताना त्यांना त्याच्यामध्ये गुंतवण्यात आलं. जिथं अन्याय होतो, अत्याचार आहे त्याच्या विरुद्ध ‘सामना’ उभा राहतो. ते काम अखंडपणाने त्यांचं चालू होतं. शासकीय यंत्रणेमध्ये जिथे भ्रष्टाचार आहे, त्या भ्रष्टाचाराविरुद्ध ते नेहमीच लिहितात. याची आपल्या सर्वांना कल्पना आहेच.

हे पुस्तक वाचल्यानंतर मी एवढंच विचार करतोय कधी महाराष्ट्र किंवा देशातल्या जनतेनं देशात परिवर्तन केलं तर पहिलं काम हे करावं लागेल की सामान्य माणसांचा, राजकीय पक्षांचा जो मूलभूत अधिकार आहे तो या ईडी कायद्याचा आधार घेऊन उध्वस्त करण्याची जी काही तरतूद कायद्यामध्ये झालेली आहे ती तातडीने बदलली पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल, ते करणं यामध्ये आम्हा लोकांना लक्ष द्यायची आवश्यकता आहे. म्हणून हे पुस्तक जे कोणी वाचतील, त्यातल्या त्यात राज्यकर्ते जे असतील त्यांनी हे सगळं गांभीर्याने बघण्याची गरज आहे. राज्य येतं- जातं, निवडणुका जिंकतात- हरतात. पण न्यायव्यवस्था ही लोकांसमोर आदर्श अशी असली पाहिजे. ती व्यवस्था ईडी सारख्यांच्या हातात दिलेल्या शक्तीमुळे जर आपल्याला निर्णय घेण्यासाठी इच्छा असून सुद्धा मर्यादा येत असतील तर ती बदलण्याची आवश्यकता आहे, याची खात्री ही आपल्या सगळ्यांना पटली.

माझ्या मते, राऊत यांनी हे पुस्तक लिहून फार मोठं काम केलं. त्यामुळे विचार करणारे लोक माझी खात्री आहे की याच्यात दुरुस्ती करण्याची जी आवश्यकता आहे, सत्तेचा गैरवापर हा सहज केला जातो. ही जी संधी राज्यकर्त्यांना आपण दिली, त्याच्यातून मुक्त होण्याचं काम हे करण्याबद्दलचं विचार करावा लागेल. राऊत यांच्या या पुस्तकामुळे आणि विशेषतः आता सांगण्यात आलं की, इंग्लिश आणि हिंदीमध्ये सुद्धा करणार आहेत. त्याचा परिणाम निश्चित जे लोकप्रतिनिधी असतील, लोकशाही संबंधाची आस्था ज्यांच्यामध्ये आहे ते लोक त्याचा विचार करतील. त्या कामामध्ये तुमची आणि माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की, अशांच्या पाठीशी उभं राहणं. हे काम केलं तर माझी खात्री आहे की, संजय राऊत यांनी जे लिखाण केलं ते खऱ्या अर्थाने फलदायी ठरलं, असा निष्कर्ष काढता येईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, रविवार, १८ मेचे राशिभविष्य

Next Post

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आज महाराष्ट्रात….असे आहे कार्यक्रम

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
shivraj singh chouhan e1735892068643

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आज महाराष्ट्रात….असे आहे कार्यक्रम

ताज्या बातम्या

GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
445

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीबाबत झाला हा मोठा निर्णय…

जुलै 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तीने खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, मंगळवार, ८ जुलैचे राशिभविष्य

जुलै 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011