नाशिक – ९४ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलाचा आज समारोप होत असतांना या संमेलनात पुणे येथून आलेले दोन प्रकाशक कोरोना पॅाझिटिव्ह आढळले आहे. या दोघांच्याही संपर्कात आलेल्यांचा शोध आता घेतला जात आहे. यातील एक प्रकाशक पिंपरी येथील तर दुसरा आळंदी येथील आहे. साहित्य संमेलनात कोरोनाची दक्षता घेऊन रसिकांना आत सोडले जात आहे. या तपासणीत हे दोन जण आढळले आहे. या दोघांबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती नाशिक महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॅा. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.