नाशिक – नाशिकमध्ये पाऊस परिस्थिती असल्यामुळे आपल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडी नियोजनात थोडा बदल करण्यात आलेला आहे. शुक्रवार दिनांक ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता प्रस्ताव कुसुमाग्रज निवासस्थान (टिळकवाडी) येथून होणार आहे. पुढे ग्रंथदिंडी महापौर बंगला… रेमंड सिग्नलला उजवीकडे वळणार ..जुने सीबीएस सिग्नल ओलांडून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा .. शिवाजी रोड वरून .. नाशिक जिमखाना , सागरमल मोदी शाळा, सारडा कन्या शाळा, परशुराम सायखेडकर नाट्यगृह वरून सार्वजनिक वाचनालय येथे विसावा. त्यानंतर ग्रंथ पालखी संमेलनस्थळी कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी येथे जाणार आहे.