शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या ‘प्राजक्त प्रभा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2021 | 8:09 pm
in इतर
0
IMG 20211118 WA0202

नाशिक – साहित्य संमेलनाची सुरुवात प्राजक्त प्रभा कविता संग्रहाच्या प्रकाशन आणि काव्य वाचन कार्यक्रमातून होत आहे. या होणाऱ्या साहित्य संमेलनाचे आदरतिथ्य नाशिककर अतिशय उत्कृष्टपणे करतील असा विश्वास असून नाशिमध्ये होणारे हे साहित्य संमेलन अविस्मरणीय राहील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होत आहे.या संमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा श्रीगणेशा आज अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या ‘प्राजक्त प्रभा’ या काव्य संग्रहाचे प्रकाशनाने झाला. या काव्य संग्रहाचे प्रकाशन पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे पार पडले.

यावेळी खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, मराठी साहित्य मंडळाचे मिलिंद जोशी, उपाध्यक्ष सुधाकर शिशोदे, संमेलनाचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, प्रा.शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर,मुकुंद कुलकर्णी, खान्देश मराठा मंडळाचे सेक्रेटरी अविनाश पाटील, अशोक पाटील, मुलाखतकार स्वाती प्रभू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनामुळे साहित्य संमेलन पुढे पुढे जात होते. होईल की नाही याबाबत प्रश्न होता. मात्र सर्व नाशिक कर ठाम होते. त्यादृष्टीने होणारे साहित्य संमेलन अतिशय उत्कृष्ट होईल. या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील यासाठी प्रयत्न आहे. साहित्य संमेलनाची तयारी नाशिक कारांकडून अतिशय दर्जेदार करण्यात येत आहे. नाशिकच्या या संमेलनात काव्य कट्ट्यासाठी सुमारे साडे नऊशे हुन अधिक कवी सहभागी होणार असून काव्य वाचनाचा विक्रम करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यात आपण यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करत यावेळी प्राजक्त प्रभा या कविता संग्रहातील काही कवितांचे वाचन त्यांनी यावेळी केले.

यावेळी अभिनेत्री कवयित्री प्राजक्ता माळी म्हणाल्या की, माझ्या आयुष्यातील पहिल्या कविता वाचन आज होत आहे. तसेच काव्य संग्रहाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होत आहे. हा माझ्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा क्षण आहे. या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनास मराठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ मिळाले हे माझे भाग्य आहे. रसिकांचा मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानते असे त्यांनी यावेळी सांगत प्राजक्त प्रभा काव्य संग्रहाच्या प्रवासाचे वर्णन केले. यावेळी मराठी साहित्य मंडळाचे मिलिंद जोशी, खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील ११३ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आयोगाने केली ही घोषणा

Next Post

महाराष्ट्र चेंबर निवडणूक; उत्तर महाराष्ट्र वगळता संपूर्ण राज्यात बिनविरोध

Next Post
lalit gandhi

महाराष्ट्र चेंबर निवडणूक; उत्तर महाराष्ट्र वगळता संपूर्ण राज्यात बिनविरोध

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011