इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
समृद्धी महामार्गाने संभाजीनगरहून नागपूरला जाताना बोगद्याच्या आसपास वाहनांवर दगडफेक करून लुटमार करण्याच्या घटना घडत आहेत. या रस्त्यावर कोणतीही पोलीस यंत्रणा अथवा आपत्कालीन सेवा नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. ड्रीम प्रोजेक्ट म्हणून फक्त उद्घाटन करून मोकळे झालेले चालणार नाही, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले आहे की, आमचे @Liberal_India1 यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. समृद्धी महामार्गाने संभाजीनगरहून नागपूरला जाताना बोगद्याच्या आसपास वाहनांवर दगडफेक करून लुटमार करण्याच्या घटना घडत आहेत. या रस्त्यावर कोणतीही पोलीस यंत्रणा अथवा आपत्कालीन सेवा नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
गृहमंत्री महोदय, कृपया यात लक्ष घाला ! आपल्या घराबाहेर जवळपास शंभर एक पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल, तुम्ही ज्या ताफ्यात असतात त्यात पन्नास एक पोलीस असतील. मग ज्या जनतेच्या आशीर्वादाने तुम्ही निवडून आलात त्यांना तुम्ही वाऱ्यावर का सोडले आहे ? ड्रीम प्रोजेक्ट म्हणून फक्त उद्घाटन करून मोकळे झालेले चालणार नाही, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार ?