इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI),प्रादेशिक महाराष्ट्र कार्यालयाने खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत देशांतर्गत [ओएमएसएस (डी)] ऑगस्ट 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून तांदूळ विक्रीची घोषणा केली होती. इच्छुक खरेदीदार तांदूळ साठा खरेदी करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या ई-लिलाव सेवा प्रदाता, “m-Junction Services Limited”(https://www.valuejunction.in/fci/) या पॅनेलमध्ये नोंदणी करुन स्वतः ला समाविष्ट करून सहभागी होऊ शकतात
नोंदणी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया 72 तासांच्या आत पूर्ण केली जाईल. व्यापारी, घाऊक खरेदीदार आणि तांदूळ उत्पादक यांसारखे पात्र खरेदीदार https://www.valuejunction.in/fci/ या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. 19 आणि 20 मार्च 2025 रोजी होणाऱ्या आगामी लिलावासाठी महाराष्ट प्रदेशातून एकूण 10,000 मेट्रिक टन तांदूळ साठा देऊ केला जाणार आहे. बोलीसाठी किमान प्रमाण 1 मेट्रिक टन आहे आणि प्रति बोलीदार कमाल प्रमाण 7,000 मेट्रिक टन आहे. या देशांतर्गत खुल्या बाजार विक्री योजनेमुळे तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.