सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

SMRK महिला महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या डॉ. सौ. सुनंदाताई गोसावी यांचे निधन

by India Darpan
नोव्हेंबर 30, 2021 | 8:27 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211130 WA0252

नाशिक – गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या व नाशिकमधील महिला शिक्षण व सबलीकरणाच्या पुरस्कर्त्या प्राचार्या डॉ. सौ.सुनंदाताई गोसावी यांचे मंगळवारी दुःखद निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. संस्थेचे सचिव व डायरेक्टर जनरल डॉ. मो. स. गोसावी यांच्या त्या पत्नी आणि संस्थेच्या एच आर, डायरेक्टर व एस एम आर के महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांच्या त्या मातोश्री होत.

एम.ए.,पीएच.डी. (मराठी) साहित्य विशारद, संगीतरत्न असलेल्या प्रा. डॉ.सौ.सुनंदाताई गोसावी यांनी गृहिणीच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असतांनाच शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. जिज्ञासा महिला महाविद्यालय, नाशिक येथे १९७५ पासून दहा वर्षे त्या मानद प्राध्यापक व संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर १९८५ पासून एसएमआरके महिला महाविद्यालय, नाशिक येथे संस्थापक प्राचार्य म्हणून बारा वर्षे त्यांनी काम पाहीले. मार्गदर्शक, उत्कृष्ट अध्यापक कुशल नेतृत्व व विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाची तळमळ हे त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे ठळक पैलू.

“प्रा. गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचे वाड्:मयाचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर मराठीत संशोधन (पीएच.डी.) केले आहे. याच विषयावर त्यांचा ग्रंथ कै. डॉ. वि.ग.भिडे, माजी कुलगुरु, पुणे विद्यापीठ ह्यांच्या हस्ते प्रकाशित झालेला आहे. महिला सक्षम व स्वयं-रोजगारी व्हाव्या म्हणून एस.एन.डी.टी.विद्यापीठ बहिस्थ शिक्षण वर्ग माध्यमातून दरवर्षी ३०० महिलांना बी.ए. वर्गाचेमार्गदर्शन सतत १० वर्षे (विना मानधन) केले.

कला-वाणिज्य- गृहविज्ञान, ललित याबरोबर संगीत, संगणक, परिचर्या, विज्ञान, मानवविकास, आहारशास्त्र, कला वस्त्रोद्योग, विणकाम, कुटुंबा-गदा- व्यवस्थापन यातील पदवी- पदविका अभ्यासक्रमाची उत्तर महाराष्ट्रात प्रथम सुरुवात करून दरवर्षी २०० विद्यार्थिनांना उद्योजक अविण्यास पायाभूत कार्य व यशस्वी मार्गदर्शन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. महिलांच्या व्यक्तित्व विकासासाठी स्वानंद भजनी
मंडळाची स्थापना केली.

पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठान, नाशिक १९७९ स्थापनेत सहभाग या ‘संस्काराचे विद्यापीठ’ माध्यमातून ३०० समाज-सेवाव्रती दाम्पत्यांची अनुबंधी परिवार निर्मिती. स्वास्थ्यपूर्ण जीवन व समाज प्रबोधन सात्त्विक प्रकाशने, आध्यात्मिक उपक्रमात त्यांचे विशेष योगदान होते. प्राचार्या डॉ. सौ. सुनंदा मोरेश्वर गोसावी यांना दिल्ली येथील आय.बी.एस. संस्थेकडून ‘आदर्श महिला’ पुरस्कार.,गोखले एज्युकेशन सोसायटी : ‘आदर्श प्राध्यापिका’पुरस्कार इंडिया इंटरनॅशनल सोसायटी : शिक्षणरत्न पुरस्कार असे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. बुधवार दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता द्वारका येथील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

साहित्य संमेलनाला जायचंय? येथून मिळतील दर १५ मिनिटांनी बस (बघा वेळापत्रक)

Next Post

नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post
carona 11

नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

ताज्या बातम्या

bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
fir111

बालकामगार नियुक्त करणे सोसायटीच्या महिला चेअरमनच्या अंगलट…गुन्हा दाखल

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011