मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँकिंग नियमांकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर कारवाई केली आहे. या बँकांना कोट्यवधी रुपयांचा दंड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठोठावला आहे. कोटक महिंद्रा बँक लिमिटेडला १.०५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर इंडसलँड बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयकडून निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नियमांचे पालन करण्यात दिरंगाई करणाऱ्या बँकांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येत असते. प्रत्येक बँकेने नियमानुसार काम करावे अशी त्यामागे अपेक्षा असते. यानुसार आता खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. २९ जून २०२२ च्या आदेशानुसार कोटक महिंद्रा आणि इंडसलँड या दोन्ही बँकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. बँकिंग नियमांचे उल्लंघन आणि ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षेसाठी निर्देशित करण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई केल्याचे सांगत कोटक महिंद्रा बँकेला १.०५ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
बँकांनी ज्या प्रमाणात नियमांचे पालन करण्यात दिरंगाई केली त्याप्रमाणात दंड आकारला जातो तीच पद्धत या बँकांनाही दंड ठोठावताना लागू केली आहे. कोटक महिंद्रा बँक लिमिटेडवर बँकिंग विनियमन अधिनियम, १९४९ चे कलम २६ए चं उपकलम (२) च्या उल्लंघन प्रकरणी कारवाई केली आहे. तर इंडसइंड बँकेवर देखील त्याच कारणांमुळे गांभीर्य न दाखवल्यानं कारवाई करण्यात आली आहे. इंडसइंड बँकेनेही आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या केवायसी नियमांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर १ कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
नवजीवन को ऑपरेटिव्ह बँक, बालांगीर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, धाकुरिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोलकाता आणि दपलानी को ऑपरेटिव्ह अर्बन बँख लिमिटेड या बँकांवर देखील दंड आकारण्यात आला आहे. या बँकांना १ लाख ते २ लाख रुपयांपर्यतचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Reserve Bank of India RBI action on private banks