सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पेट्रोल, डिझेलचे दर वाढायला हवेत की घटायला? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणतात…

by India Darpan
जुलै 9, 2021 | 5:44 am
in संमिश्र वार्ता
0
shashikant das

नवी दिल्ली – इंधन दरवाढीच्या भडक्यामुळे जगण्यासाठीच्या आवश्यक सर्वच वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झालेली आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकारने दिलासा द्यावा अशी अपेक्षा जनता करत आहे. परंतु तसे प्रयत्न होताना दिसत नाहीये. याच पार्श्वभूमीवर महागाई नियंत्रणात आणण्यासाठी इंधनावरील कर घटवावा. त्याने महागाईचा दर वाढणार नाही, असे आवाहन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केंद्र सरकारला केले आहे. इंधन दरवाढ आणि अन्नधान्यांच्या किमती वाढल्याने जूनमध्ये किरकोळ महागाई दर ७ महिन्यांच्या उच्चस्तरावर राहिला आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला योग्य दिशेकडे नेण्यासाठी सरकारी पातळीवर मोठी पावली उचलली जाणे आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्यासाठी चलनविषयक उपाय राबविणे आवश्यक आहे. तसेच महागाईची स्थिती मर्यादित कक्षेत राहावी यासाठी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे शक्तिकांत दास म्हणाले.

petrol

प्रत्येक स्तरावर उपाययोजना आवश्यक
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राजकोषीय, चलनविषयक आणि प्रत्येक क्षेत्रिय पातळीवर उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे दास काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. आरबीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या तिमाही पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. पुढील काळातील परिस्थिती पाहून व्याजदर कमी ठेवण्याचे प्रयत्न सुरू राहतील, असे समितीने म्हटले आहे.
पेट्रोल शंभरीपार
पेट्रोल आणि डिझेलची किंमत गुरुवारी सलग दुसर्या दिवशी वाढली होती. त्यामुळे देशभरात इंधनाच्या किमती उच्चस्तरावर पोहोचल्या आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल १००.२१ रुपये प्रतिलिटरवरून वाढून १००.५६ रुपयांवर पोहोचले. डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रतिलिटर नोंदविण्यात आला. देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या असून, राज्यांच्या स्थानिक करांच्या आधारावर वास्तविक दर भिन्न आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून देशात इंधनदरवाढीचा आलेख चढाच आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विशेष लेख – मोदींनी केलेले नवे बदल किती प्रभावी?

Next Post

नाशिक – जिल्हयातील १४ तालु्क्यात कोरोना रुग्णांची संख्या १५० च्या आत, मनपा क्षेत्रातही रुग्णसंख्येत घट

Next Post
carona 11

नाशिक - जिल्हयातील १४ तालु्क्यात कोरोना रुग्णांची संख्या १५० च्या आत, मनपा क्षेत्रातही रुग्णसंख्येत घट

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011