इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांनी इंग्लिश फुटबॉल क्लब लिव्हरपूल एफसीला खरेदी करण्यात रस दाखवला आहे. द मिररच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांनी क्लबची चौकशी केली आहे. यासंदर्भात रिलायन्सकडून काहीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
इंग्लिश प्रीमियर लीग क्लबचा सध्याचा मालक फेनवे स्पोर्ट्स ग्रुप आहे. फेनवे स्पोर्ट्सने ऑक्टोबर २०१० मध्ये मर्सीसाइड क्लबचे अधिग्रहण केले. द मिररच्या मते, लिव्हरपूल एफसी संघाची विक्री करण्यात मदत करण्यासाठी फेनवे स्पोर्ट्सने गोल्डमन सॅक्स आणि मॉर्गन स्टॅनली यांची नियुक्ती केली आहे.
मुकेश अंबानींची खेळात आवड : मुकेश अंबानी यांच्या कंपनीकडे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट टीम मुंबई इंडियन्सची मालकी आहे. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याव्यतिरिक्त, ती अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची व्यावसायिक भागीदार आहे. मात्र, असे वृत्त समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑगस्ट २०१० मध्ये, मीडिया रिपोर्ट्सने असे सुचवले होते की मुकेश अंबानी आणि सुब्रत रॉय यांनी लिव्हरपूलसाठी त्यांचे प्रस्ताव दिले होते. मात्र, हा करार होऊ शकला नाही.
Reliance Mukesh Ambani Football Club Interest
Race Buy