पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणताही मोबाइल फोन वापरताना त्यामध्ये रिचार्ज करणे अत्यंत गरजेचे असते. त्याकरिता ग्राहक वेगवेगळ्या कंपनीच्या शोधत असतात. त्यापैकी कोणता प्लॅन स्वस्त आहे, याकडे सर्वांचेच लक्ष असते. परंतु अलीकडच्या काळात आणि खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्लॅनचे दर वाढविले आहेत. त्यामुळे आणि ग्राहकांना भुर्दंड बसत आहे. टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना देत असतात. त्याचवेळी, रिलायन्स जिओ कंपनी देखील आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी अनेक उत्तम योजना ऑफर करत असते, त्या अंतर्गत ग्राहक त्यांच्या स्वत: च्या इच्छेनुसार विविध प्रकारचे रिचार्ज करू शकतात. या रिचार्ज प्लॅनची किंमत ग्राहकांच्या बजेटनुसार कमी ठेवण्यात आलेली आहे. यासोबतच त्यात अनेक अनेक फायदेही मिळतात.
टेलीकॉम कंपनीकडून विविध प्रकारचे प्लॅन ऑफर केले जातात, त्यामध्ये तुम्हाला कॉलिंग ते डेटा आणि फ्री एसएमएस दिले जातात. मात्र याच दरम्यान रिलायन्स जिओने ग्राहकांच्या लाखो ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. या कंपनीने आपल्या तीन योजनांच्या किमती वाढवल्या आहेत. या तीन प्लॅनबद्दल आणि आता त्यांची किंमत किती वाढली आहे, याबद्दल जाणून घेऊ या…
155 रुपयांचा प्लॅन
Jio ने आपल्या 155 रुपयांच्या प्लॅनची किंमत 186 रुपयांपर्यंत वाढवली आहे. या प्लॅनमध्ये, वापरकर्त्याला 28 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात.
186 रुपयांचा प्लॅन
जिओने 186 रुपयांचा प्लॅनही महाग केला आहे. 186 रुपयांच्या प्लॅनची किंमत 222 रुपये करण्यात आली आहे. या प्लॅन अंतर्गत, वापरकर्त्याला 28 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात.
749 रुपयांचा प्लॅन
Jio ने 749 रुपयांच्या प्लॅनची किंमत 899 रुपयांपर्यंत वाढवली आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 336 दिवसांसाठी दरमहा 2GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 28 दिवसांसाठी 50 SMS मिळतात. तसेच कॉलिंग, एसएमएस आणि डेटा व्यतिरिक्त, रिलायन्स जिओ या प्लॅनवर ग्राहकांना त्यांच्या सर्व अॅप्सचे विनामूल्य सदस्यता देखील देते.