रथसप्तमी
माघ शुद्ध सप्तमी या दिवशी यंदा (७ फेब्रुवारी) रथसप्तमी साजरी केली जाते. त्याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत..

व्हॉटसअॅप – 9373913484
हिंदू धर्मातील सर्व सणवार हे निसर्गातील विविध घटकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरे केले जातात. रथसप्तमी देखील निसर्गाचा जीवन दाता ब्रम्हांडनायक सहस्त्ररश्मी सूर्य या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. हिंदू धर्मात सूर्य उपासनेस सर्वाधिक महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार आजच्या दिवशी महा ऋषी कश्यप देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्याचा जन्म झाला. सूर्य हा रथारूढ आहे अशी ही पौराणिक मान्यता त्याच्या रथाला सात शुभ अश्व आहेत म्हणून सप्तमी तर बारा चाकी आहेत याच बारा राशी होत. सूर्याच्या रथाचे सात अश्व हे सात वार याचे प्रतीक आहे. सूर्य हाच समस्त निसर्ग चक्र व जीवन चक्र त्याचा चालक आहे.
सूर्योपासना अशी करावी
या दिवशी सूर्योदय आधी स्नान आटोपून सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. सूर्य उपासना सूर्य बीज मंत्र आदित्य हृदय स्तोत्र सूर्याष्टकम् सूर्य कवच स्तोत्रपठण अथवा श्रवण करावे. 12 सूर्यनमस्कार घालावेत. तुळशीपुढे रथारूढ सूर्याची रांगोळी काढून त्यावर गोवऱ्या रचून मातीचे सुगडे ठेवावे. त्यामध्ये दूध तांदूळ साखर घालून अग्नी प्रज्वलित करावा हे दूध अग्नीवर उतू जाईपर्यंत तापवावे. अग्नीवर उतू जाणारे दूध हाच सूर्याला नैवेद्य असतो. सूर्य किरणात दूध तापवल्याने त्यात विटामिन डी चा अंतर्भाव होतो. सुगडी मध्ये उर्वरित दूध प्रसाद म्हणून प्राशन करावे.
रथ सप्तमी या दिवसाला धार्मिक पौराणिक महत्त्व आहे तसेच वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते हाडे बळकट असतात विटामिन डी प्राप्त होते म्हणून योग तसेच प्राणायाम यामध्ये सूर्यनमस्कार यास विशेष महत्त्व आहे. निसर्गचक्राचा कर्ताधर्ता असल्याने सूर्याच्या विविध गुणवैशिष्ट्ये यावर आधारित बारा नावे मित्र रवी सूर्य भानू खग पूष्ण हिरण्यगर्भ आदित्य मरीच सवित्र अर्क भास्कर ही आहेत. रथसप्तमीच्या दिवशी अनेक भाविक अळणी उपास करतात दीपदान अन्नदान यास विशेष महत्त्व आहे. महिलांच्या हळदी कुंकू समारंभा ची समाप्ती रथसप्तमीला होत असते.