इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज पुणे येथील बालेवाडी मैदानात भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी नाशिकसह परिसरातून हजारो पदाधिकारी कार्यकर्त्यांसह माजी खासदार समीर भुजबळ हे उपस्थितीत होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांचे समीर भुजबळ यांनी स्वागत केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अभिनेता सयाजी शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
संगमनेर येथे अल्पोहराची व्यवस्था
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वतीने संगमनेर येथे हॉटेल मयूर एक्सप्रेस येथे अल्पोहराची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी स्वतः माजी खासदार समीर भुजबळ हे उपस्थित आहेत.
याठिकाणी जमलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी माजी खासदार समीर भुजबळ यांनी संवाद साधला. याठिकाणी अल्पोपहारानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २६ वा वर्धापन दिन आज पुणे बालेवाडी येथील मैदानावर पार पडला.