नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या बेताल वक्तव्यांच्या माध्यमातून महापुरुषांचा अपमान करणाऱ्या परिणामी महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत शनिवार,दि. १७ डिसेंबर २०२२ रोजी हल्लाबोल मोर्चा सकाळी १० वाजता राणीचा बाग भायखळा येथून काढण्यात येणार आहे. या मोर्चात नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशा सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, माजी सभापती संजय बनकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, बाळसाहेब कर्डक, वसंत पवार, प्रा.कविता कर्डक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, युवती जिल्हाध्यक्ष किशोरी खैरनार, माजी नगरसेवक हरिष भडांगे, सुषमा पगारे, जगदीश पवार, भाऊसाहेब भवर, राजेंद्र डोखळे, बाळकाका कलंत्री, संजय खैरनार, यशवंत शिरसाठ, कविता कर्डक,ज्ञानेश्वर शेवाळे, योगेश गोसावी, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, मोहन शेलार आदी उपस्थितीत होते.
यावेळी समीर भुजबळ म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भावराव पाटील यांच्यासह इतर महापुरुषांच्या विरोधात सत्ताधारी पक्षातील जबाबदार नेत्यांकडून बेताल असे वक्तव्य करण्यात येत आहे. महापुरुषांचा व महाराष्ट्र राज्याचा होणारा हा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. या महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने लाखोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात येत आहे. महाविकास आघाडीचा हा मोर्चा १७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० राणीचा बाग येथून सुरु होणार असून आझाद मैदान येथे या मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे अशा सूचना त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केल्या.
तसेच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तालुका पातळीवरून नियोजन करून प्रत्येक तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी यांनी मोर्चा सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. मोर्चाच्या नियोजनाबाबत नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा आढावा घेतला. यावेळी दिपक लोणारी, उमेश खताळे, खंडेराव आहेर, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, विजय पाटील, बाळासाहेब गाढवे, बहिरू मुळाने, सोमनाथ बोराडे, बाळासाहेब लोखंडे, बाळासाहेब आडके, नंदकुमार कदम, नरेश देशमुख, राजाराम मुरकुटे, भास्कर भगरे, विनोद शेलार, संदीप पवार, राजेंद्र भामरे, रामदास गवळी, राजू पवार, विजय पवार, राजेंद्र सोनवणे, दिलीप आहेर, प्रकाश शेळके, केशव मांडवडे, सलीम शेख, गौरव गोवर्धने, संकेत निमसे, धनंजय रहाणे, सुरेश आव्हाड, धनंजय निकाळे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब गीते, सुरेखा निमसे, मनोहर बोराडे, शंकर मोकळ, मुजाहिद शेख, कुणाल बोरसे, मकरंद सोमवंशी, जीवन रायते यांच्यासह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.