माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
…..
१- जोरदार पाऊस –
आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. १० जुलै पर्यंत नंदुरबार तसेच मुंबई सह संपूर्ण कोकण व विदर्भातील १९ जिल्ह्यांत आणि जळगांव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर अशा ६ जिल्ह्यातील शिरपूर, सिंदखेडा, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, एदलाबाद, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, महाबळेश्वर, जावळी पाटण, शाहूवाडी, बावडा, राधानगरी, चांदगड व लगतच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे घाटावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील गोदावरी दारणा गिरणा वैतरणा कश्यपी कडवा प्रवरा,भीमा नीरा इंद्रायणी मुळा मुठा कुकडी कृष्णा-कोयना, पंचगंगा वारणा दूधगंगा भोगावती ह्या नद्या पूर-पाण्यासह दुथडी वाहु शकतात.
२- संपूर्ण मराठवाड्यातील ८ आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा तसेच जळगांव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर अशा ६ जिल्ह्यातील वर्षच्छायेच्या प्रदेशातील उर्वरित तालुक्यात आजपासुन पुढील तीन दिवस म्हणजे मंगळवार ८ जुलै पर्यंत मध्यम पावसाची शक्यता जाणवते. तर त्यापुढील २ दिवस म्हणजे बुधवार व गुरुवारी ९ व १० जुलै ला या भागात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
३- शुक्रवार दि. ११ जुलै पासून काहीशी उघडीप, काहीशी रिमझिम, तर मधूनच सूर्यदर्शन अश्या वातावरणाची शक्यता जाणवते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.