India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

वेटिंग तिकीट असलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा; आता मिळणार ही सुविधा

India Darpan by India Darpan
May 20, 2023
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनेकदा रेल्वे प्रवास वेटिंगच्या तिकीटावर करावा लागतो. आणि अशा वेळी विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. पैसे खर्च करुनही सुविधा मिळत नाही आणि सीट मिळण्यासाठी टीसीच्या मागे मागे फिरावे लागते. मात्र, आता या सर्व त्रासापासून प्रवाशांची सुटका होणार आहे.

रेल्वे ही भारताची रक्तवाहिनी समजली जाते. देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचे आरक्षण करून तिकीट कन्फर्म नसेल तर मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो.  यापुढे वेटिंगवर असलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी नवी सुविधा मिळणार आहे.

प्रवाशांच्या हातात कन्फर्म तिकीट असेल तर रेल्वे प्रवास सुखाचा हाेताे. गाडीत टीसीच्या मागे फिरावे लागत नाही. मात्र, आता प्रतीक्षा यादीतील म्हणजेच वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. काेणत्या डब्यात किती जागा रिकाम्या आहेत, ही माहिती प्रवाशांना चार्ट तयार झाल्यानंतर मिळणार आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर नवी सुविधा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

नवी सुविधा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना माेबाइलवरच कळू शकेल की रेल्वेमध्ये रिक्त जागा किती आहेत आणि कुठे आहेत. आयआरसीटीसीवरून आरक्षित तिकिटे घेतानाच ‘गेट ट्रेन चार्ट’ हा पर्याय निवडण्याचा पर्याय मिळेल. नवी सुविधा सुरू झाल्यानंतर आयआरसीटीसी कडून आलेल्या एसएमएसमधील लिंकवर क्लिक केल्यास चार्ट मिळू शकेल. या सुविधेसाठी किती शुल्क लागेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. याबाबत शुल्क आकारल्यास ५ ते १० रुपयांपेक्षा जास्त राहणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या आआरसीटीसी वेबसाइटवर ट्रेनचा चार्ट मिळविण्याची सुविधा आहे. मात्र, माेबाइलवर ही माहिती मिळत नाही. त्यामुळे प्रवासी टीसीवर अवलंबून असतात.

Railway Passenger Waiting Ticket New Service


Previous Post

‘पिंक रिक्षा’ नाशिककरांच्या सेवेत… आणखी ७ रिक्षा लवकरच… गरजू महिलांनी तातडीने येथे संपर्क साधावा

Next Post

सावधान! पुढची ५ वर्षे कठीण… सूर्य आग ओकणार… पृथ्वीचे तपमानही वाढणार… असा आहे इशारा

Next Post

सावधान! पुढची ५ वर्षे कठीण... सूर्य आग ओकणार... पृथ्वीचे तपमानही वाढणार... असा आहे इशारा

ताज्या बातम्या

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; यासाठी घेतले पाच हजार

May 31, 2023

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

May 31, 2023

या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत; जाणून घ्या, गुरुवार, १ जून २०२३चे राशिभविष्य

May 31, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ जून २०२३

May 31, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group