इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळे काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल, पण, सध्या ती योग्य वेळ नाही असं वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात केल्यानंतर त्याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी या वक्तव्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारणार का? राहुल गांधी येणाऱ्या काळात आरक्षण संपवणार असतील, तर मनोज जरांगे पाटील हे म्हणतील का? की राहुल गांधी देखील देवेंद्र फडणवीसजींचा माणूस आहे?
लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसची खरी आणि संविधान विरोधी भूमिका राहुल गांधींच्या तोंडून आता समोर आली आहे.
आता या प्रसाद लाड यांच्या आरोपावर मनोज जरांगे पाटील काय उत्तर देतात हे महत्त्वाचे आहे.