पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधान भवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतीनिधी, नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विनयकुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह सैन्यदलातील अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.