India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा… पुण्यातील बॅनरबाजी राज्यभरात चर्चेत

India Darpan by India Darpan
February 6, 2023
in राज्य
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेच्या निवडणुका ओटोपताच विधानसभेच्या पोटनिवडणुकांचा धुराळा उडाला आहे. यावेळी कसबापेठेतील निडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष वेधले आहे. त्याचे कारण म्हणजे, या भागात सुरू असलेली बॅनरबाजी. कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा का?, समाज कुठवर सहन करणार? अशा आशयाचे बॅनर कसबापेठेत लागले आहेत. निनावी बॅनरबाजीद्वारे भाजपविरोधी वातावरण तापविले जात असल्याची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यात सुरू झाली आहे.

लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यास त्याच कुंटुंबातील सदस्याला उमेदवारी द्यायची आणि अन्य पक्षांनी सहकार्य करून बिनविरोध निवडून द्यायचे अशी महाराष्ट्राची परंपरा आहे. मुख्यमंत्री शिंदे सुद्धा बिनविरोधसाठी फोनाफोनी करीत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही तशीच भूमिका मांडली आहे. भाजपकडून याच परंपरेची आठवण सतत करून दिली जात आहे. पण, त्याचवेळी भाजपने कसबा मतदार संघातून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना टाळून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. यावर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपमधील नाराजी नाट्य उघड झाले आहे. यामुळे मविआने ताकदीनिशी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता निनावी बॅनर्सनी मतदारसंघातील वातावरण तापविले आहे.

कुणी लावले बॅनर?
पुण्याच्या कसबा मतदारसंघात अनोखे बॅनर लागले आहेत. पोटनिवडणुकीवरून बॅनर्सद्वारे भाजपला चिमटे घेतले जात आहेत. या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यावर कुणाचेही नाव नाही. एक जागरूक मतदार एवढाच उल्लेख आहे. पक्षातीलच नाराजांनी हे बॅनर्स लावले असल्याचीही चर्चा रंगली आहे.

टिळक कुटुंबाला का डावलले?
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेक जण नाराज असल्याचे बोलले जात आहे. आजारी असतानाही राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुक्ता टिळक मतदानाला मुंबईत आल्या होत्या. रुग्णवाहिकेतून त्या आल्या होत्या. पक्षासाठी एवढी निष्ठा दाखवूनही त्यांच्या कुटुंियांना का डावलले गेले आहे? अशी चर्चाही कसब्यात दबक्या आवाजात होत आहे.

Pune Banner By Poll Election Politics BJP Cast


Previous Post

शिंदे-फडणवीस सरकारचा जाहिरातबाजीवर भर; ७ महिन्यात खर्च केले एवढे कोटी

Next Post

बापरे! १० तासात तब्बल ३ शक्तीशाली भूकंपांनी हादरले तुर्की… हजारो इमारती कोसळल्या… जीवित आणि मालमत्तेची प्रचंड हानी… (व्हिडिओ)

Next Post

बापरे! १० तासात तब्बल ३ शक्तीशाली भूकंपांनी हादरले तुर्की... हजारो इमारती कोसळल्या... जीवित आणि मालमत्तेची प्रचंड हानी... (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group