India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पुण्यातील १८ पोलिस स्टेशनमध्ये स्थापन होणार हा अनोखा कक्ष; असा होणार त्याचा फायदा

India Darpan by India Darpan
January 5, 2023
in राज्य
0

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यातील 18 पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्ष स्थापन करण्यात आले असून उर्वरित पोलीस ठाण्यात लवकरच अशा प्रकारच्या कक्षाची स्थापना करण्यात येईल; त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्वारगेट पोलीस ठाण्यातील बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्षाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेशकुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, कायद्यानुसार सर्वच पोलीस ठाण्यामध्ये बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्षाची सुरुवात होणार आहे. लहान बालके व महिलांवर अन्याय व अत्याचार झाल्यास ते पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना पोलीसांची भिती वाटू नये, त्या ठिकाणी विश्वास वाटावा, दडपण येऊ नये यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले, बालस्नेही कक्षात येणारे अत्याचारित बालक, विधीसंघर्षग्रस्त बालक बोलके व्हावे, गुन्ह्याची नोंद होईपर्यंत त्यांच्या बसण्याची, रमण्याची, खेळण्याची व्यवस्था करण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. कक्ष उभारण्यासाठी सामाजिक उत्तर दायित्व निधीसोबतच जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल.
आरोपींनी गुन्हा केल्यानंतर त्याला लवकर जामीन मिळाला नाही, न्यायालयात गतीने खटले दाखल करुन चालवले आणि गुन्हे सिद्धतचे प्रमाण वाढून शिक्षा झाल्यास आरोपींच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होईल. त्यादृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असेही यावेळी श्री. पाटील म्हणाले.

यावेळी श्री. पाटील यांनी मुलांना खेळणी व खाऊचे वाटप केले तसेच गुलटेकडी येथील सेठ दगडूराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप केले. यावेळी ‘होप फॉर दि चिल्ड्रेन फॉऊडेशन’चे व्यवस्थापक शकील शेख यांचा कक्ष उभारणीमध्ये केलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

असा आहे ‘बालस्नेही कक्ष
आमदार माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून स्वारगेट पोलीस ठाणे अंतर्गत बालस्नेही कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. पोलीस ठाणे परिसरातील रंगरंगोटी व स्वच्छता तसेच नुतनीकरण पुणे पोलीस मास निधीतून करण्यात आले आहे. कायद्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात बाल कल्याण कल्याण पोलीस अधिकारी नेमणे आवश्यक आहे. बालकांचे जबाब नोंदवितांना त्यांच्यावर दडपण येऊ नये यासाठी हे बालकल्याण पोलीस अधिकारी पिडीत बालक, विधीसंघर्षग्रस्त बालकांसोबत संवाद साधतील तसेच त्यांना समुपदेशन करण्यात येईल. अत्याचारग्रस्त पिडीत बालक त्यांच्यावर घडलेल्या अत्याचाराची माहिती विश्वासाने व मनमोकळेपणाने देण्यासाठी कक्षात खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्यासाठी येथे प्रयत्न केला जाणार आहे.

बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी त्यास प्रोत्साहित करणे. बालक गैरवर्तन करु नये याकरीता त्यांच्यामनात सकारात्मक विचार निर्माण करणे. बालकाला घडलेल्या घटनेची माहिती देण्यासोबत त्यास समुपदेशन व मानसशास्त्रीय आधार किंवा वैद्यकीय उपचार देणे आदी काम या ठिकाणी होणार आहे. स्वारगेट पोलीस ठाणे व होप फॉर दि चिल्ड्रेन फॉऊडेशन यांच्या समन्वयाने बालस्नेही कक्षाचे कामकाज करण्यात येणार आहे.

Pune 18 Police Stations New Department Will Establish
Children’s Women


Previous Post

कोरोना पश्चात मानवी आरोग्यावर होताय हे गंभीर परिणाम; बघा, तज्ज्ञ काय सांगताय

Next Post

रोग निदान आणि उपचारासाठी नवीन पद्धत ‘जिमोनिक्स, झेब्राफिश’; काय आहे ती? तिचे फायदे काय?

Next Post

रोग निदान आणि उपचारासाठी नवीन पद्धत ‘जिमोनिक्स, झेब्राफिश’; काय आहे ती? तिचे फायदे काय?

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group