सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील ना.म. सोनवणे तथा आबासाहेब सोनवणे महाविद्यालयातील रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका प्रतिभा रौंदळ -भदाणे यांना बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांनी केलेल्या सोल्युशन केमिस्ट्री या विषयात सादर केलेल्या प्रबंधाबद्दल त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आलेली आहे .त्यांना विद्यापीठाचे प्राध्यापक सय्यद सुलतान औरंगाबाद येथील मौलाना आझाद कॉलेज चे प्राचार्य डॉ. मझहर फारुकी यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे ,चिटणीस दिलीप दळवी, तालुका सदस्य डॉ प्रसाद सोनवणे, महाविद्यालयाचे प्राचार्य विजय मेधणे, दिंडोरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के. एन. गायकवाड, प्राचार्य डॉ दिलीप धोंडगे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन राघो नाना अहिरे, प्रा डॉ जयराज आहेर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. प्राध्यापक प्रतिभा रौंदळ- भदाणे या सटाणा महाविद्यालयातील निवृत्त इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापिका कल्पना पाटील- भदाणे व सटाणा वकील संघाचे अध्यक्ष ऍड. पंडितराव भदाणे यांच्या सुनुष्या असून डांगसौंदाणे आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीचे निवृत्त सचिव गोपाळराव रौंदळ यांच्या त्या कन्या आहेत. तर गव्ह. ठेकेदार राहुल भदाने यांच्या त्या पत्नी आहेत त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Prof Pratibha Raundal Bhadane PhD