इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहेत. केंद्र सरकाराच्या या बजेटमध्ये नेमकं काय असणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. या बजेट सत्रात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यानी सांगितले की, नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात मांडले जाईल. नवीन कायदा आयकर कायदा १९६१ ची जागा घेईल. आता नवीन करप्रणातील १२ लाखापर्यंत आयकर लागणार नाही.
त्यावर आता काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी या अर्थसंकल्पातील घोषणेवर टीका करतांना सांगितले की, संसदेत आज अर्थसंकल्पावर चर्चा झाली. ते म्हणाले की, मध्यमवर्गीयांसाठी १२ लाख रुपयांपर्यंतचा आयकर मोफत करण्यात आला आहे. पण कोणीतरी सरकारला विचारावे की देशातील किती लोक कर भरण्यास पात्र आहेत, किती लोक वर्षाला १२ लाख रुपये कमवू शकतात?
तर सत्य हे आहे की देशात फक्त ७ कोटी लोकच कर भरतात. १३५ कोटी लोक कर भरू शकत नाहीत कारण ते इतके कमवू शकत नाहीत. या सरकारने प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावला आहे, प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे. महागाई प्रचंड वाढली आहे, पण कमाई मात्र ठप्प झाली आहे.