India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

युगप्रवर्तक ब्रह्माकुमारी संस्थेचे साकार संस्थापक पिताश्री ब्रह्माबाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त लेख

India Darpan by India Darpan
January 19, 2022
in व्यासपीठ
0
युगप्रवर्तक ब्रह्माकुमारी संस्थेचे साकार संस्थापक पिताश्री ब्रह्माबाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त लेख
0
SHARES
129
VIEWS
WhatAppShare on FacebookShare on Twitter

 

पिताश्री ब्रह्माबाबा

ब्रह्माकुमारी या आंतरराष्ट्रीय स्थरावरील संस्थेचे साकार संस्थापक पिताश्री ब्रह्माबाबा यांनी आपली साकार काया १८ जानेवारी १९६९ रोजी त्यागुन सुक्ष्मलोकातुन आपले बिव्य कार्य सुरू केले. शास्त्रांमध्ये ब्रह्मदेवाला विश्व नवनिर्मता महटले गेले आहे. मात्र आजच्या कलयुगात सर्वत्र वो[विपरीत परिस्थिती असतांना ब्रह्माकुमारी संस्थेचे संस्थापक ब्रह्मा बाबा यांनी नाव समाज रचनेची पायाभरणी केली. आज संस्थेचे मुख्यालय माउंट आबू (राजस्थान) येथे आहे.

संस्थेची 137 देशात ९००० पेक्षा अधिक सेवाकेंद्र व उपसेवाकेंद्र कार्यरत आहेत. संस्थेला राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. यात युनोतर्फे (संयुक्त राष्ट्रसंघ) संस्थतेला ७ शांतीदूत पुरस्कारांनी स्नमानित करण्यात आले आहे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत ईश्वरीय संदेश प्रसारित व्हावा यासाठी संस्थे अंतर्गत मिडिया विंग, ज्युरीस्ट विंग, वूमन विंग अशा विविध २० प्रभागांची स्थापना करण्यात आली. ब्रह्माकुमारी संस्थेच्या या दाही दिशांना झालेल्या विस्थाराचे जनक पिताश्री ब्रह्मा बाबा यांचा स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या जीवन कार्याचा घेतलेला हा आढावा….

राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदिदीजी
(उपक्षेत्रीय संचालिका, नाशिक)

ब्रह्मा बाबा यांचे पुर्वाश्रमीचे नाव लेखराज होते. सन १८७६ मध्ये सिंध प्रांतात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एका शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांच्या बाल्य काळात आई व किशोरावस्थेत वडीलांचे छत्र हरपले. आपली पारखी दृष्टी व अंगात असलेल्या कलागुणांच्या बळावर त्यांनी आपला स्वतःचा हिरे जवाहरात चा व्यवसाय सुरू केला. अल्पावधीतच दादा त्या काळातील नामांकित व्यावसायीकांध्ये गणले जावु लागले. त्यांचा व्यवसाय भारतातीलच काय पण शेजारील देशातील राजे रजवाड्यांपर्यंत चालत असे. त्यांच्यातील आपलेपणा, दयाभाव मुळे लोक त्यांना प्रेमाने दादा संबोधत.

दादा हिरे जवाहिरातांचे व्यापारी म्हणुन कमी परंतु आपल्या सौम्य, सदाचारी, अध्यात्मिक व्यक्तित्वामुळे अधिक ओळखले जात असत. दादा पराकोटीचे धार्मीक होते. त्यांनी आपल्या जीवनात १२ गुरू केले होते. ते नियमीत गिता पाठी होते. त्यांच्या नसानसात भक्तिभाव होता. त्या सोबतच महिलांना समान अधिकार मिळावा यासाठी सुद्धा ते आग्रही होते.

दादांची अजून संपत्ती जमा करून उर्वरित आयुष्य भक्ती सेवेमध्ये व्यतीत करण्याचा होता. मात्र वयाच्या ६० व्या वर्षी दादांच्या जीवनात महान बदल घडून येतो. त्यांना अचानक वैराग्य प्राप्त होते. एक वेळेस ते वाराणसी येथे आपल्या स्नेहींकडे गेले असता, त्यांना सृष्टीच्या महाविनाशाचा साक्षात्कार होतो. दादा बघतात की सर्वत्र भुकंप, प्रलय होत आहे. धरतीवर मोठ मोठे बॉब पडत आहेत सर्वत्र हाहाकार माजला आहे. दादांचे मन विदीर्ण होते. त्यांना ते दृष्य असाह्य होते. अशातच त्यांना लगेचच नवसृष्टीच्या साक्षात्कार होतो. यात दादांना दिसते की सर्वत्र सुख-शांती आहे. सृष्टी सतोप्रधान आहे. सर्वत्र आनंदी आनंद आहे.

काही दिवसांपर्यंत दादांना या साक्षात्कारांचा अर्थ समजत नाही. साक्षात्कारांच्या या श्रृंखलेत त्यांना पुन्हा विष्णुच्या विविध रूपांचा साक्षात्कार होतो. या साक्षात्कारामधुन दादांना ‘अहं विष्णु चर्तुभुज, तत्वं असा संदेश मिळतो. कालांतराने दादांना समजते की स्वयं निराकार शिव भगवंत आपल्याला दिव्य साक्षात्कार करवित आहेत. स्वयं निराकार शिव भगवंत सृष्टीच्या नवनिर्मीतीची धुरा दादांवर सोपवितात. दादांच्या या दिव्य कार्याचेच प्रतिक म्हणुन त्यांना “प्रजापिता ब्रह्मा” या अलौकीक नावाने संबोधण्यात आले.

या दिव्य घटने नंतर ब्रह्माबाबा माता-कन्यांचे एक ट्रस्ट बनवुन आपली संपुर्ण चल व अचल संपत्ती या ट्रस्टला दान करतात. ओम मंडली या नावाने ते आपल्याच घरात सत्संग सुरू करतात. सुरूवातीला या सत्संगात येणाऱ्या साधकांवर समाजातुन मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकला जातो. परंतु अदम्य साहस व ईश्वर प्रित समोर सर्व फिके पडतात. भारत-पाकिस्तान विभाजनानंतर सन् १९५० मध्ये ओम मंडलीचे राजस्थान येथील आबु येथे स्थलांतर करण्यात येते. येथुनच ब्रह्माबाबा ईश्वरीय संदेश प्रसारीत करण्याचे कार्य अधिक विस्तारीत करतात.
आपल्या ३३ वर्षांच्या ईश्वरीय सेवेच्या काळात ब्रह्माबाबा आपल्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येक साधकास ईश्वरीय शक्तिंनी ओतप्रोत केले.

ब्रह्मा बाबांचे नेहमी सांगणे असे मी जे कर्म मी करेल मला बघून सर्व जण तसे कर्म करतील. त्यामुळे त्यांनी प्रत्येक सेवा हि स्वतः करून इतरांना प्रेरणा दिली. नवसमाज निर्मितीच्या कार्यात अनाडी, वृद्ध, अशिक्षित समजल्या जाणाऱ्या माता भगिनी व पुरुषांना घेऊन बाबांनी संस्कार परिवर्तन सो संसार परिवर्तन हा नारा दिला. समाजातील या त्याज्य घटकांच्या संस्कारांमध्ये बाबांनी बदल घडून समाजात रोल मोडेल म्हणून प्रस्तुत केले. शास्त्रांमध्ये सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग व कलयुग असे चार युगांचे वर्णन आढळते. मात्र कलयुगांत नंतर काय? याचे उत्तर मात्र ब्रह्माबाबांच्या जीवन कार्यातून मिळते.

कलयुगी विकारयुक्त, अशुद्ध संस्कारांचे परिवर्तन राजयोग साधने द्वारे सतयुगी सदाचारी, निर्विकारी, शुद्ध संसारांमध्ये झाल्यास धर्तीवर स्वर्ग निर्माण होईल असा निर्धार ब्रह्मा बाबांना होता. बाबांनी आपले जीवन इतके उच्च कोटीचे बनविले कि त्याची प्रेरणा आजही प्रत्येक ब्रह्मा वत्स घेत आहे. या मुळेच म्हणावेसे वाटते कि आदम को खुदा मत कहो आदम खुदा नाही… लेकीन खुदा कि नूर से आदम जुदा नाही…..

अशा प्रकारे ब्रह्मा बाबांनी आपले आदर्शवत जीवन बनवून वयाच्या ९३ व्या वर्षी म्हणजेच १८ जानेवारी १९६९ रोजी इहलोकाचा निरोप घेतला. मात्र ते आजही प्रत्येक ब्रह्मावत्सांना ईश्वरीय प्रेरणेने भरपुर करीत आहेत. ३५० सदस्यांपासून सुरू झालेल्या या कार्यात आज १३० देशांमधील ८५०० पेक्षा जास्त सेवाकेंद्रांमधुन ९ लाखां पेक्षा अधिक साधक कार्यरत आहेत. ८६ वर्षांपुर्वी रोवलेल्या या अंकुराने आज वटवृक्षाचे रूप धारण केलेले आहे. संस्थेच्या वरिष्ठ दादी दिदी आपल्या अनुभवात सांगतात की ब्रह्माबाबांच्या देहावसानानंतर साधारण ७० च्या दशकात मोठया प्रमाणात साधक या ईश्वरीय कार्यात समर्पित झाले. या वरून समजते की ब्रह्माबाबा आपले दिव्य अलौकीक कार्य आजही सुक्ष्मप्रेरणेतुन करीत आहेत. ते आजही मानवजातीस आवाहन करीत आहेत की आपल्यातील काम, क्रोध, लोभ, मोह आदि विकारांना त्यागुन ईश्वरीय कार्यात संम्मिलीत व्हा. त्यांच्या या सुक्ष्म हाकेस आपण योग्य प्रतिसाद देवुन विश्व नव निर्मितीच्या कार्यात आपला वाटा उचलावा… ओम शांत

Previous Post

वाळलेले महागडे मेकअप कीट आहे? असा करा पुन्हा वापर

Next Post

फरारी भामटा विजय मल्ल्याला दणका; आलिशान बंगला रिकामा करण्याचे आदेश

Next Post
विजय मल्ल्याचा ब्रिटनमध्ये राहण्यासाठी आणखी एक डावपेच…

फरारी भामटा विजय मल्ल्याला दणका; आलिशान बंगला रिकामा करण्याचे आदेश

ताज्या बातम्या

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

लागा कामाला ! महापालिका निवडणूक आरक्षण सोडत या तारखेला

May 23, 2022
चालबाज चीनचा हा डाव उघड

चीनची ऑडिओ क्लीप व्हायरल; असा रचला आहे मोठा कट

May 23, 2022
कोरोना आणि सोशल मिडिया

चिंताजनक! कोरोनामुळे दर ३३ तासांनी १० लाख नागरिक होताय अत्यंत गरीब; महागाईचा भडका वाढला

May 23, 2022
हसण्याच्या पद्धतीवरूनही स्वभाव कळतो? कसं काय?

इंडिया दर्पण – हास्य षटकार – भिकारी आणि शेठजी

May 23, 2022
….आता रोजचे वाढदिवसही कळेल

आज आहेत या मान्यवरांचे वाढदिवस – २४ मे २०२२

May 23, 2022
आजचे राशिभविष्य – शनिवार – १७ जुलै २०२१

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस वाचा, २४ मे चे राशिभविष्य

May 23, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group