India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीत बिघाडी; नागपुरात ३ तर औरंगाबादमध्ये २ उमेदवार, खरा कोण?

नागपुरात माविआचे 3 उमेदवार, खरा कोण? बंडाळीने नेत्यांनाही केले अवाक

India Darpan by India Darpan
January 17, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबादच्या पदवीधर आणि नागपूरच्या शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. नागपुरात महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. तर भाजप समर्थित एकच उमेदवार रिंगणार आहे. नागपुरात काँग्रेसचे सुधाकर आडबाले मविआकडून निवडणूक लढवत आहेत. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडेही मैदानात आहेत. विशेष म्हणजे कपिल पाटलांची शिक्षक भारती महाविकास आघाडीचाच भाग आहे. तर राष्ट्रवादीच्या सतीश इटकेलवार यांनीही अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे तेही मैदानात आहेत. तर अपक्ष नागो गाणार यांना भाजपने पाठींबा जाहीर केला आहे. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण? तेही अद्याप स्पष्ट झाले नाही.

माविआत ठरल्यानुसार पूर्वी नागपूरची जागा ठाकरे गटाला मिळाली होती. तर नाशिक पदवीधरची जागा काँग्रेसला सुटली होती. मात्र नाशिकमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवरुन घोळ झाला. आणि नागपूर-नाशिकच्या जागेत अदलाबदल झाली. त्याप्रमाणे नागपुरातून ठाकरे गटाचे गंगाधर नाकाडेंनी आपली उमेदवारी मागे घेतली. तेही अवघे 5 मिनिटे शिल्लक असताना, नाकाडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश मान्य केला. राष्ट्रवादी काँग्रेसने सतीश इटकेलवार यांनाही अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी त्यांना फोनही केला. पण त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने इटकेलवारांना निलंबित केले आहे.

औरंगाबादमध्ये मविआचे दोन उमेदवार
औरंगाबादच्या शिक्षक पदवीधर निवडणुकीतही राष्ट्रवादीचेचे 2 उमेदवार झालेत. राष्ट्रवादीच्या प्रदीप सोळुंकेंनी अर्ज मागे घ्यावा यासाठी अनेक प्रयत्न झाले. पण अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत नॉटरिचेबल राहून सोळुंकेंनी बंडखोरी केली. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या प्रदीप सोळुंकेंनी बंडखोरी केलीय. औरंगाबादमध्ये तिहेरी लढत होणार आहे. औरंगाबादच्या शिक्षक पदवीधरमध्ये विक्रम काळे हे राष्ट्रावादीचे अधिकृत उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार प्रदीप सोळुंके मैदानात आहेत. तर भाजपकडून किरण पाटील मैदानात आहेत. म्हणजेच औरंगाबादमध्ये तिहेरी लढत होणार आहे.

Politics Vidhan Parishad Election Maha Vikas Aghadi
Graduate and Teachers Constituency


Previous Post

कोरोना संकटानंतर प्रथमच राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा; मुंबईत या तारखेपासून आयोजन, ५० हजाराचे बक्षिस

Next Post

नाशिकच्या समतानगरमध्ये मोठा अनर्थ टळला; महिलेचे घर व दुचाकी पेटवली

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिकच्या समतानगरमध्ये मोठा अनर्थ टळला; महिलेचे घर व दुचाकी पेटवली

ताज्या बातम्या

देशात आता तयार होणार कृत्रिम हिरे! अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली ही मोठी घोषणा; असे बनतात हे हिरे…

February 2, 2023

अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी किती निधी मिळाला? कुठले मार्ग होणार?

February 2, 2023

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने बोलावली ५० आमदारांची बैठक; चर्चांना उधाण

February 2, 2023

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group