मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीचे समन्स

by India Darpan
जून 23, 2023 | 1:06 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
FzP5hjuXgAMGiVr e1687505751140


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई महापालिकेच्या अधिकारक्षेत्रात झालेला कोविड सेंटर घोटाळा सध्या चांगलाच गाजत आहे. कोविडचे थैमान थांबून बराच कालावधी उलटला असला तरी मुंबई महापालिकेत झालेला सेंटर घोटाळ्याने आता वादळ आले आहे. या प्रकरणी ईडीने मुंबई महापालिकेवर धाड टाकली असून या अंतर्गत कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, याप्रकरणी ठाकरे गटाचे निटकवर्तीय आणि उबाठा शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे.

कोरोना काळात लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडून कोविड सेंटर उभारणी आणि वैद्यकीय उपकरण खरेदी कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म, भागीदार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू नंदकुमार साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीने एसबीआयच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन थेट मुंबई महापालिकेवरच छापा टाकला आहे. बुधवारी ठाकरे गटाच्या सचिवासह पालिकेचे अधिकारी आणि इतरांवर ईडीने छापा टाकला होता. सुमारे १५ ठिकाणी ही छापेमारी झाली होती. या छाप्यांत आढळलेल्या कागपत्रांची शहानिशा करण्यासाठी ईडी पालिकेत पोहोचली आहे. ईडीने आपला मोर्चा महापालिकेच्या खरेदी खाते विभागाकडे वळविला आहे. महत्वाचे म्हणजे ईडीसोबत स्टेट बँकेचे अधिकारी देखील आहेत. कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी कारवाई आहे. कोविड सेंटरसाठी लागणारी सामग्री खरेदीमध्ये काही गैरव्यवहार झालेत का याची चौकशी केली जात आहे. या खात्याकडूनच सर्व साहित्य कोविड सेंटरना दिले जात होते.

कोण आहे सूरज चव्हाण
सूरज चव्हाण हे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सचिव आहेत. ठाकरे यांच्या अनेक निर्णयांमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. मुंबई महापालिकेने कोविड काळात जे टेंडर काढले त्याच्याशी चव्हाण यांचा संबंध असल्याचा संशय आहे. याचाच एक भाग म्हणून चव्हाण यांच्या निवासस्थानीही ईडीने छापा टाकला. विविध कागदपत्रांची शहानिशा केली आहे. तब्बल १५ तास हे सर्व सुरू होते. आता चव्हाण यांची चौकशी होणार आहे. त्यासाठी त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. दरम्यान, ईडीने चव्हाण यांच्या निवासस्थानी छापा टाकला आणि चौकशी पूर्ण केल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांची आस्थेवाईपणे चौकशी केली तसेच त्यांना धीर दिला.

किरीट सोमय्यांनी केला दावा
कामाला मंजुरीच्या पत्रावर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची स्वाक्षरी असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी वर्क ऑर्डरचे पत्र सोशल मीडियावर टाकले आहे. ईडीने बुधवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील १० ते १५ ठिकाणांवर छापे टाकले. त्यात मुंबई महापालिकेतील तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय व शिवसेना सचिव सूरज चव्हाण, सुजीत पाटकर यांच्या घर आणि कार्यालयांची तपासणी करण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बिनधास्त करा मुक्त विद्यापीठाचे एमबीए; मिळाली ही मान्यता

Next Post

टायटॅनिकचे अवशेष पहायला गेलेल्या अब्जाधीशांच्या पाणबुडीचा स्फोट का झाला? समोर आले हे मोठे कारण…

Next Post
titanic e1687506621545

टायटॅनिकचे अवशेष पहायला गेलेल्या अब्जाधीशांच्या पाणबुडीचा स्फोट का झाला? समोर आले हे मोठे कारण...

ताज्या बातम्या

Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011