India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अमित शहांसह अनेक केंद्रीय मंत्री व दिग्गजांची मांदियाळी नाशिक दौऱ्यावर; राज्याचे निम्मे मंत्रिमंडळही राहणार हजर, हे आहे निमित्त

India Darpan by India Darpan
February 9, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकांची आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून सभा, अधिवशनावर भर दिला जात आहे. अलिकडेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थित औरंगाबादमध्ये जाहीर सभा पार पडली होती. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नाशिकमध्ये जाहीर सभेसह राज्य अधिवेशन घेणार आहेत.

१० आणि ११ फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये भाजपचे राज्य अधिवेशन होणार असून त्याची तयारी सुरू आहे. राज्यातील पदाधिकाऱ्यांसह कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले जाणार आहे. २०२४ च्या निवडणुकीची पूर्वतयारी भाजपकडून केली जात आहे. या निवडणुकीत भाजपच्या वतिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावावर निवडणुका भाजप लढवणार आहे हे जवळपास स्पष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतचा प्रचार कायम ठेवण्यासाठी भाजपकडून जाहीर सभा घेतल्या जात आहे.

देशभरातच आयोजन
२०२४ च्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करून भाजपने संपूर्ण देशभरातच जाहीर सभा, पक्षीय अधिवेशन, कोअर कमिटीच्या बैठका आयोजित करण्यावर भर दिला आहे. त्याद्वारे स्थानिक नेते कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, पक्षाची धोरणे, कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सोपविणे हा त्यामागील हेतू आहे. त्याचवेळी जाहीर सभांच्या माध्यमातून जनतेवर पक्षाची छाप कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नाशिकमध्ये जोरदार तयारी
नाशिकमध्ये आयोजित होणाऱ्या सभेत उत्तर महाराष्ट्रातून नागरिक सहभागी होतील. या सभेची सध्या भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थित हे राज्य अधिवेशन होणार आहे. हजारो पदाधिकारी आणि कोअर कमिटीचे पदाधिकारी या राज्य अधिवेशनाला सहभागी होणार आहे. अधिवेशनासह सभा यशस्वी करण्यासाठी भाजपतर्फे अनेक मंत्री आणि पदाधिकारी नाशिकमध्ये ये-जा करीत आहेत. औरंगाबादमध्ये झालेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील अधिवेशन यशस्वी करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन लक्ष देऊन आहेत.

Politics BJP Party Meeting Amit shah Nashik Ministers


Previous Post

या तारखेला होणार राष्ट्रीय लोकअदालत; असा घेता येईल लाभ

Next Post

याला म्हणतात समाजसेवा… वृद्ध दाम्पत्याने दान केली तब्बल दीड कोटींची औषधे… तोगेरे कुटुंबियांचे प्रेरणादायी कार्य…

Next Post

याला म्हणतात समाजसेवा... वृद्ध दाम्पत्याने दान केली तब्बल दीड कोटींची औषधे... तोगेरे कुटुंबियांचे प्रेरणादायी कार्य...

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group