India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘द केरला स्टोरी’बद्दल पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी केले हे मोठे भाष्य

India Darpan by India Darpan
May 5, 2023
in राष्ट्रीय
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या चित्रपटाला होणाऱ्या विरोधाचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात उचलून धरावा, ही घटना दुर्मिळच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत केरला स्टोरी या चित्रपटाला होणाऱ्या विरोधावरून काँग्रेसवर टिका केली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे स्वतः पंतप्रधान प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. बेल्लारी येथे त्यांची सभा होती. या सभेत त्यांनी केरला स्टोरी या चित्रपटाला होणाऱ्या विरोधावरून काँग्रेसवर निशाणा साधला. या चित्रपटाला केरळ सरकार आणि काँग्रेसकडून जोरदार विरोध होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्यात येत आहे, असा आरोप केरळ सरकारने केला आहे. तर काँग्रेसने चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी लावून धरली आहे. या चित्रपटात चार महिलांना मुस्लीम समाजात घेऊन दहशतवादी संघटनेत सामील केले जाते, असे दाखविले आहे. त्यामुळे विरोध केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र या विरोधावर आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘दहशतवादी कट असलेल्या एका कथानकावर आधारित केरला स्टोरी हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. यामध्ये एका राज्यातील दहशतवादी कट दाखविण्यात आले आहेत. केरळ हे देशातील सर्वांत सुंदर राज्य आहे आणि येथील लोक परिश्रमी व प्रतिभावान आहेत. पण त्याच केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कटांचा खुलासा या चित्रपटाने केला आहे,’ असे मोदी म्हणाले.

बॉम्बचा आवाज येतो, पण…
बॉम्ब-बंदूक आणि पिस्तुलाचा आवाज येतो, पण समाजाला आतून पोखरण्याचा आवाज येत नाही. न्यायालयाने दहशतवादाच्या या स्वरुपाबद्दल अनेकदा चिंता व्यक्त केली आहे. पण दुर्दैवाने काँग्रेस दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठिशी उभे आहे, या शब्दांत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

काँग्रेसची सौदेबाजी
दहशतवादी प्रवृत्तीच्या लोकांसोबत काँग्रेस मागच्या दाराने राजकीय सौदेबाजी करत आहे. त्यामुळेच कर्नाटकमधील लोकांनी काँग्रेसपासून सावध राहिले पाहिजे. कारण काँग्रेसला असे काही करताना बघतो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला.

PM Narendra Modi on The Kerala Story


Previous Post

संजय राऊत कुणामुळे तुरुंगातून सुटले? ईडीच्या तावडीतून कसे बाहेर आले? त्यांनीच केला हा खुलासा

Next Post

आदिवासींच्या आदिम भाषा म्हणजे खरं खुरं सोनं… म्हणून त्या टिकायला हव्यात… त्या जपण्यासाठी काही प्रयत्न होताय का?

Next Post

आदिवासींच्या आदिम भाषा म्हणजे खरं खुरं सोनं... म्हणून त्या टिकायला हव्यात... त्या जपण्यासाठी काही प्रयत्न होताय का?

ताज्या बातम्या

मुंबईत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या बरोबर कांदा प्रश्नावर झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा नाही….

September 26, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – संता आणि बंताची चर्चा

September 26, 2023

आनंद महिंद्रा अडचणीत…याप्रकरणी गुन्हा दाखल

September 26, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींना नवीन संधीचा योग येईल… जाणून घ्या, बुधवार, २७ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य

September 26, 2023

दुर्दैवी घटना….मनमाडला पाणी भरताना शॉक लागून महिलेचा मृत्यू

September 26, 2023

देशभरात ४६ ठिकाणी रोजगार मेळ्यात ५१ हजार नियुक्ती पत्रांचे वितरण, महाराष्ट्रात इतक्या जणांना मिळाली संधी

September 26, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group