विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना होत आहे. आज सायंकाळी होणाऱ्या शपथविधीमध्ये ३६ नवे मंत्री शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्याच्या ७ राज्यमंत्र्यांना बढती मिळणार असून ते आता कॅबिनेट मंत्री होणार आहेत. सध्याच्या मंत्रिमंडळातील तब्बल १२ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यातील एक जणाला राज्यपाल पद देण्यात आले आहे.
महाराष्ट्रातून ४ जणांना मंत्रीपद मिळणार असल्याचे निश्चित झाले आहेत. त्यातील तीन जण हे बाहेरच्या पक्षातून भाजपमध्ये आले आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे, दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांचा समावेश आहे. म्हणजेच, बाहेरुन भाजपमध्ये आलेल्यांना थेट केंद्रीय मंत्रिपद देण्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आयात झालेल्यांनी भाजपमध्ये टिकून रहावे, यासाठी हे समीकरण असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील ४३ जणांची नावे पक्की झाली आहेत. हे सर्वजण सायंकाळी शपथ घेणार आहेत.
ही नावे अशी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॅा. भारती पवार, कपिल पाटील, डॅा. भागवत कराड, ज्योतिरादित्य शिंदे, सर्बानंद सोनोवाल,पशुपती कुमार पारस, डॉ वीरेंद्र कुमार, रामचंद्र प्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव, किरण रिजिजू, राजकुमार सिंह, हरदीप सिंह पुरी, मनसुख मंडाविया, भुपेंद्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी किशन रेड्डी, अनुराग सिंह ठाकूर, पंकज चौधरी, अनुप्रिया सिंह पटेल, सत्यपालसिंह बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करंदलजे, भानू प्रतापसिंह वर्मा, दर्शना विक्रम जार्दोस, मीनाक्षी लेखी, अन्नपूर्णा देवी, ए नारायण स्वामी, कौशल किशोर, अजय भट, बीएल वर्मा, अजय कुमार, देवूसिंह चौहान, भगवंत खुबा, प्रतिमा भौमिक, डॉ सुभाष सरकार, डॉ राजकुमार रंजन सिंह, बिश्वेश्वर तुडू, शंतनू ठाकूर, डॉ मुंजापारा महेंद्रभाई, जॉन बार्ला, डॉ एल मुरुगन, डॉ निशीत प्रामाणिक.