India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला जन्मलेल्या बालकांना मिळणार सोन्याची अंगठी

India Darpan by India Darpan
September 16, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी जन्माला येणाऱ्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या तमिळनाडू युनिटकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच या प्रसंगी इतर योजनाही राबवण्यात येणार असून, ७२० किलोग्रॅम मासेही वाटण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत तमिळनाडूमध्ये अंगठी आणि मासे वाटप होणार आहे. याविषयी तमिळनाडू युनिटकडून माहिती देण्यात आली आहे. याविषयी मत्स्यव्यवसाय आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगण म्हणाले, “आम्ही अंगठी वाटपासाठी चेन्नईमधील आरएसआरएम या सरकारी रुग्णालयाची निवड केली आहे. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या मुलांना सोन्याची अंगठी देण्यात येईल. ही प्रत्येक अंगठी २ ग्रॅमची असणार आहे. या माध्यमातून नवजात आम्ही स्वागत करणार आहोत. या रुग्णालयात १७ सप्टेंबरला १० ते १५ बालकांचा जन्म होऊ शकतो.”

७२० किलो मासे वाटप
पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूमध्ये ७२० किलो मासेवाटपदेखील करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. मत्स्य विक्रीय प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व पंतप्रधान मस्त्य संपदा योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी ७२ वर्षांचे होणार असल्याने ७२० हा आकडा निवडला असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री मुरुगन यांनी म्हणले आहे.

दिल्लीमध्ये विशेष उपक्रम
दिल्लीमध्ये १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच झोपडपट्टीतील लोकांसाठी विशेष शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून, १८ ऑक्टोबरला ही शर्यत होणार आहे.

PM Modi Birthday Child Gold Ring Gift


Previous Post

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; जितेंद्र आव्हाडांनी घेतलेले सगळे शासन निर्णय रद्द

Next Post

इंडिया दर्पण विशेष लेख – टेनिस सम्राटाची चटका लावणारी निवृत्ती

Next Post

इंडिया दर्पण विशेष लेख - टेनिस सम्राटाची चटका लावणारी निवृत्ती

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group