नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– आपल्या शूर हवाई योद्ध्यांना आणि सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एएफएस आदमपूरला जाऊन भेट दिली. “धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या आपल्यासारख्या योध्द्यांसोबत राहणे हा एक अतिशय खास अनुभव आहे”, असे मोदी म्हणाले.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे; आज सकाळी मी एफएस आदमपूरला जाऊन आपल्या शूर हवाई योद्ध्यांना आणि सैनिकांना भेटलो. धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या या लोकांसोबत राहणे हा एक अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी आपल्या सशस्त्र दलांनी जे काही केले आहे त्याबद्दल भारत त्यांचा सदैव कृतज्ञ राहिल.”
https://twitter.com/narendramodi/status/1922184749277208713