इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाटणा विमानतळावर युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधला. “त्याच्या क्रिकेट कौशल्याचे देशभर कौतुक होत आहे! भविष्यातील यशस्वी कामगिरीसाठी माझ्या शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे “आज पाटणा विमानतळावर, तरुण क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबाची भेट झाली. त्याच्या क्रिकेट कौशल्याचे देशभर कौतुक होत आहे! भविष्यातील यशस्वी कामगिरीसाठी माझ्या शुभेच्छा.”
अवघ्या ३५ चेंडूत केले होते शतक
आयपीएलच्या राजस्थान विरुध्द गुजरातच्या सामान्यात १४ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३५ चेंडूत शतक ठोकलं. तो राजस्थानकडून खेळत असतांना त्याने ही कामगिरी करत इतिहास रचना. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलाय. तर त्याचं शतक आयपीएलमध्ये दुसरं वेगवान शतक ठरलं आहे. या शतकी खेळात ७ चौकार आणि ११ षटकांराचा समावेश होता. याआधी बंगलुरुकडून खेळणा-या ख्रिस गेलने पुणे वॅारियर्सविरुध्द ३० चेंडूत शतक ठोकले होते. वैभव सूर्यवंशीचा आयपीएलमधील हा तिसरा सामना होता. या सामन्यात त्याने स्फोटक फलंदाजी करत चौकार आणि षटकांचा पाऊस पाडला. आयपीएल २०२५ चा ४७ वा सामना राजस्थान रॅायल आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आला. ज्यामध्ये राजस्थानने ८ विकेटसने विजय मिळवला.
हे शतक पाहून प्रशिक्षक राहुल द्रविड देखील त्याच्या व्हीलचेअरवरुन उभा राहिला आणि नाचू लागला. आयपीएलपूर्वी राहुलच्या पायाला दुखापत झाली होती. ज्यामुळे तो संपूर्ण आयपीएलमध्ये व्हीलचेअरवर दिसला. पण, वैभवची खेळी पाहिल्यानंतर तो सगळं विसरुन आनंदाने उड्या मारु लागला.