इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातल्या कैथल इथल्या रामपाल कश्यप यांची भेट घेतली. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर मोदी यांची प्रत्यक्ष भेट होईपर्यंत अनवाणी चालण्याचा प्रण १४ वर्षांपूर्वी कश्यप यांनी केला होता हे जाणून मोदी भावुक झाले. लोकांनी विधायक सामाजिक कार्यावर आणि राष्ट्र उभारणीवर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन मोदी यांनी केले.
एक्स माध्यमावरील वेगवेगळ्या संदेशात त्यांनी लिहीले आहे :“आज यमुनानगर इथल्या सभेत मी कैथलच्या रामपाल कश्यप यांना भेटलो. मी पंतप्रधान झाल्यानंतर आणि माझी प्रत्यक्ष भेट झाल्यानंतरच पादत्राणे घालेन असा प्रण रामपाल यांनी १४ वर्षांपूर्वी घेतला होता.
रामपाल यांच्यासारख्या व्यक्ती मला भावुक करतात आणि मी त्यांच्या प्रेमाचा स्वीकारही करतो मात्र अशा प्रकारचा प्रण घेणाऱ्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की, मी या प्रेमाचा आदर करतो,…कृपया विधायक सामाजिक कार्याशी आणि राष्ट्र उभारणीशी निगडीत असलेल्या कामावर लक्ष केंद्रित करा!”
“हरियाणातील यमुनानगरमधल्या कैथलचे रामपाल कश्यप यांना भेटण्याचा आज योग आला. त्यांनी १४ वर्षांपूर्वी प्रण केला होता की, जोपर्यंत मोदी पंतप्रधान होत नाहीत आणि मी त्यांना भेटत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही. त्यांना चप्पल घालायला देण्याची संधी मला आज मिळाली. मी या सर्वांच्या भावनेचा आदर करतो परंतु अशा प्रकारची शपथ घेण्यापेक्षा त्यांनी सामाजिक अथवा देशहिताच्या कार्याची शपथ घ्यावी.”
https://twitter.com/narendramodi/status/1911756643777618032?s=46