पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव शहरातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक मारल्याने भीषण अपघाताची घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. अपघातात टेम्पोमधील चालक व वाहक दोघे जण जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार शहरातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मालेगावकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या शहादा आगाराच्या शहादा, दोंडाईचा धुळे नाशिक या बसला पिंपळगाव शहरातील मुंबई आग्रा महामार्गावर विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला.अपघातात टेम्पोमधील मुक्तारअली गुलाम अली सैय्यद, ३८ रा रामनगर शिरसोली जळगाव, मिसार सुजाण खाटीक वय ६२ रा.जळगाव दोघेही जखमी असून त्याच्यवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.अपघातात बसचे किरकोळ तर टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.
याबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो ह प्रमोद देवरे, राकेश धोंगडे अधिक तपास करत आहे.
