सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शाळेत जाणा—या विद्यार्थ्यांना जागृत करणे हा देखावा सटाण्याच्या मुंजवाड येथील शाळेत सादर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असतात. शिक्षणाचे महत्व सांगण्यासाठी गणेशोत्सवाच्या माध्यमातून नाशिकच्या सटाणा तालूक्यातील मुंजवाड येथील जनता विद्यालयाने देखाव्यातून दाखून दिला आहे. महात्मा फुले यांनी एक जानेवारी १८४८ साली फुले वाड्यात सुरु केलेली पहिली शाळा त्यात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाळेत जाणारे विद्यार्थी असा देखावा असून देखाव्यातून शाळे प्रति विद्यार्थ्यांना जागृत करणे या उद्देशाने शाळेच्या शिक्षकांनी हा सुंदर देखावा सादर केला आहे.