पुणे – ओमिक्रॉनच्या फैलावामुळे हयातीचा दाखला जमा करण्याची निवृत्तीवेतनधारकांची समस्या UIDAI ने सोडवली आहे. UIDAI ने निवृत्तीवेतनधारकांसाठी FACE AUTHENTICATION सेवेचा प्रारंभ केला आहे. या माध्यमातून निवृत्तीवेतनधारक आता घरबसल्या आपला हयातीचा दाखला जमा करू शकणार आहेत. या सेवेसाठी एका अॅपचे अनावरण करण्यात आले आहे. AadharFaceRd App असे या अॅपचे नाव आहे. मोदी सरकारने ईज ऑफ सब्मिटिंग लाइफ सर्टिफिकेट अभियानांतर्गत हे पाऊल उचलले आहे. यामुळे निवृत्तीवेतनधारकांना बँक किंवा कोषागाराच्या चकरा माराव्या लागणार नाही.
अॅप कसे काम करेल हे समजून घेऊया
– AadharFaceRd या अॅपला गुगल स्टोअरवरून डाउनलोड करा.
– आरडी सेवा इन्स्टॉल केल्यानंतर अॅप सेटिंगमध्ये दिसेल.
– हे अॅप्लिकेशन ://jeevanpramaan.gov.in/package/download या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकता.
– अँड्रॉइड फेस अॅपसाठी क्लाइंड इन्स्टॉलेशन डॉक्युमेंटवर क्लिक करा.
– अॅप इन्स्टॉल करण्यासाठी फाइलवर क्लिक करा.
इकडे लक्ष द्या
१) ऑपरेटर प्रमाणन एका वेळची प्रक्रिया आहे.
२) निवृत्तीवेतनधारक ऑपरेटरही होऊ शकतो.
३) ऑपरेटर प्रमाणन झाल्यानंतर निवृत्तीवेतनधारक प्रमाणनासाठी एक स्क्रिन उघडेल.
४) एक ऑपरेटर अनेक निवृत्तीवेतनधारकांचे डीएलसी जनरेट करू शकतो.
ही प्रक्रिया करा
– आवश्यक माहिती भरा -> जमा करा-> ओटीपी नोंदवा-> पुन्हा जमा करा
स्क्रिनवर दाखविण्यात आलेल्या पद्धतीनुसार सर्व विवरण योग्यरित्या भरा, दोन्ही चेकबॉक्सवर क्लिक करा आणि जमा करा.
– चेकबॉक्सवर क्लिक करा आणि लाइव्ह फोटोग्राफसाठी स्कॅन करा.
– या पॉप-अप विंडोवर स्कॅन प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी हो पर्याय निवडा.
– चेकबॉक्सवर क्लिक करा आणि पुढे जा.
– फेस ऑथेंटीकेशन करताना आपला चेहरा सरळ ठेवा आणि स्क्रिनवर दाखविलेल्या निर्देशांचे पालन करा.
– चेहर्याचे स्कॅनिंग झाल्यानंतर मोबाईल स्क्रिनवर आयडी आणि पीपीओ नंबरसह डीएलसी सबमिशन दाखवले जाईल.
– जर काही समस्या असेल तर dic.doppw@gov.in वर मेल करा.
(नोट – चुकीची माहिती दिल्यास निवृत्तीवेतन वितरण कार्यालयात डीएलसीचे अपडेशन होऊ शकत नाही.)