इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सिंध प्रांतात एका हिंदू अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असून या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तान मध्ये अल्पसंख्याक असलेला हिंदू समाज नेहमीच असुरक्षिततेच्या वातावरणात वावरत आहे. आता महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.
एका अधिकृत वृत्तानुसार, नराधमांनी केवळ या अल्पवयीन पीडित मुलीवर बलात्कार केला नाही तर तिच्या डोळ्यात चाकूही भोसकला होता. यामुळे मुलीच्या डोळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यात ही मुलगी गंभीररीत्या जखमी झालीय. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मुलीची सध्या मृत्यूशी झुंज सुरु असून ही मुलगी जिवंत राहण्याची शक्यता कमी असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून कळते.
सदर अल्पवयीन मुलगी ही आठ वर्षांची असून ती सुमारे ५ दिवसांपूर्वी अत्यंत गंभीर व चिंताजनक अवस्थेत आढळून आली होती. सध्या या मुलीवर उमरकोट येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मुलीवर अत्यंत भयानक सामूहिक बलात्कार करण्यात आला असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. इतकंच नाही, तर तिच्या दोन्ही डोळ्यात नराधमांनी चाकूने हल्ला केल्याने या पीडितेच्या दोन्ही डोळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर आले होते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या मुलीची प्रकृती अत्यंत नाजूक असून तिचा जीव वाचण्याची शक्यता फारच कमी आहे. सिंध प्रांतात हिंदूंवर अत्याराच्या अनेक घटना याआधीही समोर आलेल्या आहेत. त्यात बलात्कार, हत्या, अपहरण यासारखे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार उघडकीस आलेले आहेत. या प्रकरणामुळे केवळ पाकिस्तानच नाही तर भारतात देखील निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
Pakistan Hindu Minor Girl Gang Rape Crime