India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कांद्याचे दर कोसळत असल्याने अखेर नाफेड जागे झाले… घेतला हा मोठा निर्णय…. शेतकऱ्यांना दिलासा

India Darpan by India Darpan
May 24, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सतत पडत आहेत.यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कांदा लागवडीचा खर्चही सुटत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.तातडीने कांद्याच्या भावात होणारी घसरण न थांबल्यास जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले जातील अशी भिती व्यक्त करत कांदा खरेदी लवकरात लवकर सुरू करावी अशी सूचना वजा आदेश खासदार हेमंत गोडसे यांनी नाफेड प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, नाफेडकडून पुढील आठवड्यापासून कांदा खरेदी सुरू होणार आहे.

मागील गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात सतत घसरण होत आहे.जिल्ह्यातील दहा बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक असून शेतकऱ्यांना हवा तसा बाजारभाव मात्र मिळत नाही. सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमीत कमी साडे तीनशे तर जास्तीत जास्त एक हजाराच्या आसपास भाव मिळत आहे.आज मितीस शेतकऱ्यांना सरासरी साडे सहाशे रुपये इतकाच भाव कांद्याला मिळत आहे. लागवडीसाठीचा खर्च सुटत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.यातून जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेत कांद्याला मोठी भाववाढ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गळ घातली होती.

आज खासदार हेमंत गोडसे यांनी पिंपळगाव येथील नाफेड कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव कमी का मिळतो, शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी याविषयीचा आढावा खासदार हेमंत गोडसे यांनी नाफेडचे निखिल पठाडे यांच्याकडून घेतला. शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळणे अत्यंत गरजेचे आहे.आज मिळणारा कमी भाव यापुढे काही दिवस मिळत गेला तर कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत नोटीस जातील अशी भीती खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली.शेतकऱ्यांच्या कांद्याला अधिकाधिक भाव मिळण्यासाठी नाफेड मार्फत तातडीने कांदा खरेदी सुरू करावी अशा सूचना वजा आदेश यावेळी खासदार गोडसे यांनी नाफेड प्रशासनाला दिल्या. नाफेड मार्फत नाशिक जिल्ह्यातील सुमारे तीन लाख टन कांदा खरेदी होणार असून पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू करत असल्याची ग्वाही यावेळी नाफेडचे पठाडे यांनी दिल्या.

Onion Nafed Big Decision Farmers Relief


Previous Post

अखेर आशिष देशमुख यांच्यावर काँग्रेसकडून कठोर कारवाई

Next Post

नाशिक महिलांसाठी असुरक्षितच… दोघींवर बलात्कार तर एकीचा विनयभंग… वेगवेगळे गुन्हे दाखल

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक महिलांसाठी असुरक्षितच... दोघींवर बलात्कार तर एकीचा विनयभंग... वेगवेगळे गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

May 31, 2023

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

May 31, 2023

मालेगावात अवैधरित्या या औषधांची सर्रास विक्री; पोलिसांनी जप्त केला मोठा साठा (व्हिडिओ)

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group