India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

चिंताजनक! राज्यातील या शहरात सापडले ओमायक्रॉनच्या नव्या अवताराचे रुग्ण

India Darpan by India Darpan
July 23, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये देशभरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली असून, दोन रुग्णांना ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट बीए.5 ची लागण झाल्याचं निष्पन्न झाले असल्याचे विभागाने म्हणले आहे. दोन रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुण्यात पाठवण्यात आले होते. हे दोन्ही रुग्ण महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत. मात्र, सध्या व्यावसायिक कारणास्तव पुण्याच्या ग्रामीण भागांत वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्याही चांगली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अशी परिस्थिती असताना महाराष्ट्रात ओमायक्रॉन सबव्हेरियंट बीए.५ ची लागण झाल्याले रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुबईहून परतल्यानंतर पुणे विमानतळावर नियमित तपासणी दरम्यान या दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले होते. सध्या दोन्ही बाधित रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची विशेष लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आल्यानंतर आता ते कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 सब-व्हेरियंट्सच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. आतापर्यंत ओमिक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 सब-व्हेरियंट्सच्या रुग्णांची संख्या १६० वर पोहोचली आहे. त्यात पुण्यातील ९३, मुंबईतील ५१, ठाण्यात ५, नागपूरमधील ४, पालघरमधील ४ आणि रायगडमधील ३ जणांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी २५१५ नव्या रुग्णांची भर पडली आहे तर २४४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच एकूण सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ७८ लाख ६७ हजार २८० कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.९७ टक्के इतकं झालं आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर हा १.८४ टक्क्यांपर्यंत आला आहे.

Omicron Sub Variant ba 5 patient found in this city of Maharashtra


Previous Post

पुन्हा कोसळधार! पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामान विभागाचा अंदाज

Next Post

CBSE १० वी निकालात पिंपळनेरची समृद्धी कोठावदे नंदुरबार व धुळे जिल्ह्यात द्वितीय

Next Post

CBSE १० वी निकालात पिंपळनेरची समृद्धी कोठावदे नंदुरबार व धुळे जिल्ह्यात द्वितीय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group