नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागरिकांचे आरोग्य सुदृढ असले तर देशाचे आरोग्य चांगले राहते, असे म्हटले जाते. त्यामुळेच केंद्र असो की राज्य सरकार नागरिकांच्या आरोग्याची नेहमीच काळजी घेते. परंतु वेगवेगळ्या कारणांनी नागरिक आजारी पडतात, तेव्हा त्यांना गोळ्या औषधे घेणे गरजेचे ठरते. परंतु आजच्या काळात गोळ्या औषधांच्या किमती प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा भुर्दंड बसत आहे. मात्र आता काही गोळ्या औषधांच्या किमती नियंत्रणात राहणार आहेत. कारण त्या संदर्भात मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) या औषधांच्या किमतींची नियामक संस्थेने, 84 औषधांची किरकोळ किंमत निश्चित केली आहे. यामध्ये मधुमेह, डोकेदुखी, उच्च रक्तदाब यावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे प्रमुख आहेत. या हालचालीमुळे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त औषधांच्या किमतीही कमी होतील.
महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही औषध उत्पादक किंवा विपणन कंपनीने जास्त किंमत आकारली असेल तर त्यांच्याकडून व्याजासह अतिरिक्त खर्च वसूल केला जाईल. मात्र याबदलानंतर, जीएसटी वेगळा राहील, परंतु औषध उत्पादकांनी स्वतःच सरकारला किरकोळ किंमतीवर जीएसटी भरला असेल तरच ते वसूल करू शकतील. NPPA अधिसूचनेनुसार, पॅरासिटामॉल-कॅफीन टॅब्लेटची किंमत 2.88 रुपये असेल, व्होग्लिबोज आणि (SR) मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराइड टॅब्लेटची किंमत 10.47 रुपये असेल
NPPA चे कार्य देशातील औषधे आणि फॉर्म्युलेशनची उपलब्धता राखण्यासाठी किंमत, नियंत्रण आणि निर्देश प्रदान करणे हे आहे. औषध उत्पादकाने जास्त किंमत आकारल्यास त्याच्याकडून ती वसूल केली जाते. जी औषधे किंमत नियंत्रण यादीत नाहीत, ही संस्था त्यांच्यावर देखरेख ठेवते. सर्वसामान्य जनता महागाईने हैराण झाली आहे. पण याच दरम्यान सरकारने काही औषधांची किंमत निश्चित केली आहे. म्हणजे या औषधांसाठी बाजारात निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे घेता येत नाहीत.
NPPA Fixed 88 medicines price big relief to common man